21 March 2019

News Flash

Bigg Boss Marathi : ..म्हणून पुष्करला झाले अश्रू अनावर

बिग बॉसकडून पुष्करला मिळालं अनोखं सरप्राईज

पुष्कर जोग

या आठवड्याअखेर बिग बॉसच्या घरात रंगलेल्या नाट्यात पुष्करचा गट विजयी ठरला. त्याला येत्या आठवड्यात चांगलंच सप्राईज मिळणार असल्याचं या शोचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी म्हटलं होतं. आठवडा सुरू झाला आणि एकापाठोपाठ एक सगळ्याच स्पर्धकांसाठी सप्राईजेसची रांग लागली. पुष्कर मात्र आपल्या सप्राईजची वाट बघत असताना अखेर त्याची पत्नी जास्मिन या घरात शिरली आणि पुष्करचा चेहरा खुलला.

फेलिशाच्या (पुष्करची मुलगी) आयुष्यातले काही महत्त्वाचे क्षण बिग बॉसमुळे पुष्करच्या हातातून निसटले असले तरी याची भरपाई आपण तिघांनीही करण्याचं आश्वासन यावेळी जास्मिनने पुष्करला दिलं. फेलिशा खूप लहान असल्याने तिला बिग बॉसच्या घरात आणण्याची परवानगी नसल्याचं म्हणत जास्मिनने काही वेळासाठी ती गोष्ट टाळली आणि पुष्करला सरप्राईज देण्याचं ठरवलं. नंतर काही क्षणांतच फेलिशाच्या बिग बॉसच्या घरातील प्रवेशाने पुष्करचा पहिला फादर्स डे अगदी धमाल साजरा झाला.

वाचा : सायली-रोहनचं लग्न उन्मेष थांबवू शकेल का; ‘शतदा प्रेम करावे’मालिकेत नवा ट्विस्ट

आपल्या चार महिन्यांच्या चिमुरडीला सोडून बिग बॉसच्या घरात शिरलेला पुष्कर आपल्या छकुलीला पाहून अतिशय भावूक झाला आणि त्याला अश्रू अनावर झाले. तर नावातच आनंद दडलेल्या फेलिशाच्या प्रवेशाने बिग बॉसचं घर खऱ्या अर्थाने आनंदून गेलं. स्त्री दाक्षिण्याचं सतत समर्थन करण्यासाठी महेश मांजरेकरांकडून कौतुक होत असलेला पुष्कर, जास्मिन-फेलिशाच्या येण्याने भलताच आनंदला आहे. हा आनंद पुष्करला बिग बॉसच्या पुढील प्रवासासाठी नक्कीच बळ देणारे ठरेल.

First Published on June 14, 2018 8:06 pm

Web Title: pushkar jog gets a lovely surprise visit from his wife and daughter at bigg boss house