News Flash

अल्लू अर्जुन- रश्मिकाच्या ‘पुष्पा’चा सोशल मीडियावर धुमाकुळ, चाहत्यांकडून मोठी पसंती

हा चित्रपट आंध्र प्रदेशमध्ये सुरू असलेल्या लाल चंदनाची तस्करी आणि खऱ्या घटनेवर आधारीत आहे.

दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनने आपल्या अंदाजात सगळ्यांची मने जिंकली आहेत. अल्लू अर्जुनचे चाहते फक्त दक्षिण भारतात मध्ये नाही तर संपूर्ण जगात आहेत. काल अल्लू अर्जुनचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त ‘पुष्पा’ या त्याच्या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरची चर्चा सर्वत्र सुरू असून हा टीझर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

या टीझरमध्ये अल्लु अर्जुन एका वेगळ्या अंदाजात दिसत आहे. आज पर्यंत त्याच्या चाहत्यांनी या अंदाजात कधी बघितलं नसेल. अल्लू अर्जुन हा नेहमीच वेगवेगळी भूमिका साकारताना दिसतो. ‘पुष्पा’चा टीझर प्रदर्शित होताच, त्याच्या चाहत्यांनी शेअर करत त्यावर रिअॅक्शन्स दिल्या आहेत. त्यांच्या कमेंट वाचून ते सगळे त्याच्या चित्रपटाची किती आतुर्तेने वाट पाहत आहेत, याची कल्पना ही लगेच येते. चित्रपटाचा टीझर २९ कोटी पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

अल्लू अर्जुनचा आगामी चित्रपट ‘पुष्पा’ हा आंध्र प्रदेशच्या डोंगरांमध्ये सुरू असलेल्या लाल चंदनाची तस्करी आणि खऱ्या घटनेवर आधारीत आहे. या चित्रपटाद्वारे प्रेक्षक पहिल्यांदाच अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंडानाला मोठ्या प्रडद्यावर एकत्र पाहणार आहेत. हा चित्रपट १३ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 10:23 am

Web Title: pushpa allu arjun rashmika mandana upcoming film teaser release video went viral dcp 98
Next Stories
1 “२५ वर्षांपुढील सर्वांना लस उपलब्ध करावी”, सोनू सूदची सरकारकडे मागणी
2 चित्रपट परिनिरीक्षण अपिलीय लवाद बरखास्त
3 हिरो नं.१ म्हणतो, “आपुन आ गयेला है!”
Just Now!
X