14 August 2020

News Flash

‘प्यार तो होना ही था’ ची २२ वर्ष; अजयने व्यक्त केलं चित्रपट अन् काजोलविषयीचं प्रेम

अजय आणि काजोलने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली आहे

बॉलिवूडमधील ९० च्या काळात अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती झाली. यात अनेक चित्रपटांच्या माध्यमातून प्रेमावर सुंदररित्या भाष्य करण्यात आलं. त्यातलाच एक चित्रपट म्हणजे प्यार तो होना ही था. अजय देवगण आणि काजोल यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट त्याकाळी तुफान गाजला. विशेष म्हणजे आजही हा चित्रपट प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात. या चित्रपटाला नुकतेच २२ वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने अजयने एक सुंदर पोस्ट शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. विशेष म्हणजे त्याने या फोटोला जे कॅप्शन दिलं आहे, ते अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

प्यार तो होना ही था या चित्रपटाला २२ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अजयने ट्विटरवर एक छान व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत त्याने काजोलप्रतीचं प्रेमदेखील व्यक्त केलं आहे. “रील आणि रिअल लाइफचे २२ वर्ष. प्यार तो होना ही था”, असं कॅप्शन व्हिडीओला दिलं आहे. या व्हिडीओमध्ये चित्रपटातील काही सीन दिसत असून बॅकग्राऊंडला प्यार तो होना ही था चं गाणं सुरु आहे.


दरम्यान, अजय आणि काजोल यांची लव्हस्टोरी साऱ्यांनाच माहित आहे. एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर या दोघांनी २४ फेब्रुवारी १९९९ साली लग्न केलं. त्यांना न्यासा आणि युग ही दोन मुलं आहेत. अनेक चित्रपटांमध्ये काम केलेल्या काजोलने लग्नानंतर कलाविश्वातून काढता पाय घेतला होता. मात्र अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाच्या माध्यमातून तिने पुन्हा कलाविश्वात पदार्पण केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 10:39 am

Web Title: pyar toh hona hi tha film completed its 22 years ajay devgn tweet viral kajol ssj 93
Next Stories
1 डीव्हिलियर्स दांपत्याकडे ‘गूड न्युज’; अनुष्का शर्माने दिल्या शुभेच्छा
2 ‘बिग बॉस’फेम हिमांशी खुरानाने केली करोना चाचणी? जाणून घ्या सत्य
3 कतरिना कैफविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?
Just Now!
X