नावाजलेले टीव्ही कलाकार सेठ मेयेर्स, नील पॅट्रीक हॅरीस आणि सलमा हायेक पिनॉल्ट आणि अन्य कलाकारांबरोबर प्रियांका चोप्राही संयुक्त राष्ट्राचा जागतिक नागरिक महोत्सव होस्ट करणार आहे.
२४ सप्टेंबर २०१६ ला न्यू यॉर्कच्या सेण्ट्रल पार्कमध्ये होणार आहे. अनेक कलाकारांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होणार आहे. केण्ड्रीक लमर, मेचॅलीका, रिहाना, मेजर लेझर. युशेर, एली गोल्डींग, सेलेना गोमेझ यांसारखे कलाकार यात सहभागी होणार आहेत.
या सगळ्या कलाकारांच्या मांदीयाळीत एक भारतीय नावही दिमाखात उभं राहणार आहे. ते म्हणजे प्रियांका चोप्रा.
ट्विटरवर गायक युशेर बरोबरचा फोटो तिने शेअर केला. ती म्हणाली, “युशेर बरोबर काम करताना खूप मजा आली. दिग्गज कलाकारांबरोबर संयुक्त राष्ट्राचा जागतिक नागरिक महोत्सव होस्ट करण्याची संधी मिळत आहे याचा मला अभिमान वाटत आहे.”