News Flash

प्रियांका- निक जोनास लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये?

'मेट गाला २०१७'च्या रेड कार्पेटवर प्रियांका अमेरिकन गायक निक जोनाससोबत आली होती.

प्रियांका चोप्रा, निक जोनास, Priyanka Chopra , Nick Jonas

सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड कुतूहल पाहायला मिळतं. अशाच काही सेलिब्रिटींच्या यादीतील एक नाव म्हणदे अभिनेत्री प्रियांका चोप्राचं. ‘क्वांटिको’ या मालिकेमुळे बी- टाऊनमागोमाग आंतरराष्ट्रीय मनोरंजन विश्वातही प्रियांकाने आपल्या नावाचा ठसा उमटवला. सध्याच्या घडीला बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये वेगळी ओळख प्रस्थापियत करणारी ही देसी गर्ल तिच्या बहुचर्चित प्रेमप्रकरणामुळे प्रकाशझोतात आली आहे.

‘मेट गाला २०१७’च्या रेड कार्पेटवर प्रियांका अमेरिकन गायक निक जोनाससोबत आली होती. तेव्हापासून त्यांच्यात मैत्री झाली आणि साधारण वर्षभरानंतर ते दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं. बेसबॉलचा सामना म्हणू नका, डिनर डेट म्हणू नका किंवा मग निकच्या कुटुंबातील कार्यक्रम आणि त्याच्या मित्रमंडळींसोबतचं गेट टूगेदर म्हणू नका. प्रत्येक वेळी त्याच्यासोबत प्रियांकाची उपस्थिती पाहायला मिळाली. इतकच नव्हे तर त्याच्या कुटुंबियांसोबतही आता तिचे चांगलेच सूत जुळू लागले असल्याचं कळत आहे. त्यामुळेच या दोघांनीही नात्यात एक पाऊल पुढे जात लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतल्याचं कळत आहे.

‘लाइफ अँड स्टाईल’च्या वृत्तानुसार निकने लिव्ह इन साठी विचारलेली प्रियांका ही पहिलीच मुलगी असून, ती आपल्याहून वयाने मोठी असणं यात त्याला काहीच गैर वाटत नाही. याउलट ती त्याच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसींपेक्षा मोठी आणि जास्त समजुतदार असल्याचं खुद्द निकचंच म्हणणं आहे. त्यांच्या नात्याच बरीच सहजता आहे, हेसुद्धा येणारा प्रत्येक दिवस सांगत आहे.

वाचा : Alia Bhatt-Ranbir Kapoor: आलिया- रणबीरच्या रिलेशनशिपविषयी काय म्हणाली पूजा भट्ट?

येत्या काळात प्रियांका जेव्हा भारतात येणार आहे, तेव्हा निकही तिच्यासोबत येणार असल्याचं कळत आहे. त्यामुळे आता त्यांच्या नात्याविषयी कोणतीही गोष्ट लपून राहिलेली नही हेसुद्धाल तितकच खरं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2018 12:41 pm

Web Title: quantico fame bollywood actress priyanka chopra to move in with boyfriend nick jonas
Next Stories
1 #WorldMusicDay : गाना आये या ना आये गाना चाहिए..
2 ठरलं हो ठरलं! रणवीर दीपिकाचं लग्न ‘या’ तारखेला
3 कतरिनामुळेच रणबीरच्या करिअरचे वाजले तीनतेरा?
Just Now!
X