News Flash

PHOTOS: ‘क्वांटिको गर्ल’ची ही वेशभूषा ठरतेय चर्चेचा विषय..

प्रियांकाने घातलेला हा गाऊन जगातला सर्वात लांबलचक गाऊन ठरत आहे

प्रियांका चोप्रा

बॉलिवूड चित्रपटांतून नावारुपास आलेल्या प्रियांका चोप्राने मनोरंजन विश्वात आणखी एक पायरी चढत देशोदेशीच्या प्रेक्षकांनाही भुरळ घातली आहे. ‘क्वांटिको’ सीरिजमधून ‘अॅलेक्स पॅरिश’च्या भूमिकेत झळकलेली ‘पीसी’ आता तिच्या पहिल्यावहिल्या हॉलिवूडपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रसिद्धीला सुरुवात झाली असून प्रियांकासुद्धा मोठ्या उत्साहाने ‘बेवॉच’चं प्रमोशन करत आहे.

प्रियांका आणि विविध कार्यक्रमांच्या रेड कार्पेटवरील तिचा वावर नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. अगदी सहजतेनं ‘ऑस्कर’ आणि ‘एमी’ पुरस्कार सोहळ्यांच्या रेड कार्पेटवर अनेकांच्या हृदयाचा ठाव घेणाऱ्या प्रियांकाने पुन्हा एकदा मेट गाला २०१७ च्या रेड कार्पेटवर धमाकेदार एण्ट्री घेतली. यावेळी ‘राल्फ लॉरेनच्या’ ट्रेन्च कोट गाऊनमुळे प्रियांकाचा लूक आणखीनच उठावदार दिसत होता. मुख्य म्हणजे प्रियांकाने घातलेला हा पायघोळ गाऊन जगातला सर्वात लांबलचक गाऊन ठरत आहे. त्यामुळे हीसुद्धा ‘देसी गर्ल’साठी एक अभिमानाचीच बाब आहे.

‘पीसी’चा आत्मविश्वास आणि कोणताही लूक तितक्याच सराईतपणे कॅरी करण्याचा तिचा अंदाज पाहता ती नेहमीच अनेकांचं लक्ष वेधते. मुख्य म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरही तिच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ‘मेट गाला २०१७’ मध्ये प्रियांकाची एक झलक टिपण्यासाठी छायाचित्रकारांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांच्या कॅमेऱ्यात ‘देसी गर्ल’च्या या बोल्ड अदा कैद केल्या. विविध सेलिब्रिटींनीही यावेळी रेड कार्पेटवर येत ‘पीसी’सोबत फोटोसाठी पोझ दिली. सोशल मीडियावरही प्रियांकाच्या या लांबलचक गाऊनचीच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. बऱ्याचजणांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन प्रियांकाचे फोटो पोस्ट करत तिच्या या लूकचं कौतुक केलं आहे.

यंदाच्या ‘मेट गाला’मध्ये ह्यू जॅकमन, मॅट डॅमॉन, जेनिफर लोपेज, सेलेना गोमेज, सोफी टर्नर या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी सेलेना गोमेज तिच्या प्रियकरासोबत रेड कार्पेटवर पाहायला मिळाली. रेड कार्पेटवर सेलेना पहिल्यांदाच तिच्या प्रियकरासोबत आल्यामुळे तिनंही अनेकांचं लक्ष वेधलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 10:57 am

Web Title: quantico girl priyanka chopras met gala appearance in worlds longest trench coat see photos baywatch movie
Next Stories
1 Baahubali 2 ‘.. तेव्हा प्रभासकडे पैसे नव्हते’
2 शाहरुखला मात देण्यात प्रभास अयशस्वी!
3 ते बीफ नव्हतेच, ‘त्या’ व्हिडिओवर काजोलचे स्पष्टीकरण
Just Now!
X