22 September 2020

News Flash

‘की’च्या भूमिकेत जाणाऱ्या ‘का’ची कथा आवडली’

एकदम वेगळ्या संकल्पनेवरची कथा असल्याने चित्रपटासाठी होकार दिल्याचे करिनाने सांगितले.

 

बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर सध्या आर. बाल्की दिग्दíशत ‘की अँड का’ चित्रपटामुळे जास्त चच्रेत आहे. तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अर्जुन कपूरची नायिका ती यात साकारते आहे. करिना आणि अर्जुनचे चुंबनही तितकेच लोकप्रिय ठरले आहे. लग्नानंतर करिना कपूर खान चित्रपटात कामच करणार नाही. सफबरोबरच काम करेल, अशा सगळ्या चर्चा होत्या, पण मी आता काम करते आहे. आणि चुंबनदृश्य करणारच नाही, असा काही करारही केलेला नसल्याचे स्पष्ट करणारी करिना बाल्कीच्या कथेतच वेगळेपण असल्याने हा चित्रपट केल्याचे स्पष्ट करते.

या चित्रपटासाठी बाल्कीने विचारणा केली तेव्हाच ही प्रेमकथा आहे. मात्र नेहमीची पहिल्यांदा ते भेटले, प्रेमात पडले अशा पद्धतीची नाही हे त्यांनी सांगितले होते. या चित्रपटाच्या नायकाला त्याच्या वडिलांपेक्षा आईची जबाबदारी जास्त महत्त्वाची वाटते. वडिलांसारखं बनायचं ही त्याची महत्त्वाकांक्षा नाही. त्याला आईसारखं इतरांना जपण्यात, आवडीने खाऊ घालण्यात रस असतो. आणि तो जिच्या प्रेमात पडतो तिलाही तो आपली भूमिका स्पष्टपणे सांगतो. त्यामुळे अशी कथा आजपर्यंत चित्रपटात आली नव्हती. एकदम वेगळ्या संकल्पनेवरची कथा असल्याने चित्रपटासाठी होकार दिल्याचे करिनाने सांगितले.

अर्जुन कपूर तिच्यापेक्षा लहान आहे. मात्र सहकलाकार कोण असावा, याबाबतीत आपण कधीच दिग्दर्शकाकडे विचारणा करत नाही, असे तिने सांगितले. माझ्यासाठी चित्रपटाची कथा महत्त्वाची आहे आणि दिग्दर्शक कोण आहे?, याचाही मी विचार करते. आणि मी याआधी सगळ्या अभिनेत्यांबरोबर काम केले आहे. तिन्ही खान, अक्षय कुमार, अजय देवगण असं कोणीही नाही ज्यांच्याबरोबर मी काम केलेलं नाही, असं तिने सांगितलं. उलट, या चित्रपटात अर्जुनबरोबर काम करताना हसतखेळत चित्रीकरण केल्याचंही करिनाचं म्हणणं आहे.

यावर्षी ‘की अँड का’ या चित्रपटाबरोबरच ‘उडता पंजाब’ याही वेगळ्या कथेवरच्या चित्रपटात ती काम करत आहे. ‘उडता पंजाब’ ही कटू वास्तव मांडणारी कथा आहे. त्यात तर मी आणखीनच नवीन पंजाबी कलाकाराबरोबर काम केले आहे. पण आपण जाणूनबुजून अशा चित्रपटांची निवड केली नाही, असं तिने सांगितलं. ‘की अँड का’ चित्रपटातून लैंगिक विषमतेवर भाष्य केलं आहे. प्रत्यक्षात या विषमतेचा अनुभव वैयक्तिक आयुष्यात घेतलेला नसल्याचे तिने सांगितले. मात्र चित्रपट इंडस्ट्री ही आत्तापर्यंत खानांभोवतीच फिरणारी होती हेही तिने मान्य केले आहे. बॉलीवुडमध्ये हळूहळू बदल होतो आहे. कुठेतरी नायिका प्रधान विषय हाताळणारे चित्रपट प्रेक्षक आपलेसे करत असल्याने निदान या इंडस्ट्रीत स्त्री-पुरुष असमानता कमी होत जाईल, अशी आशा करिनाला वाटते. चित्रपटांमुळे सफ आणि ती सातत्याने एकमेकांबरोबर असू शकत नाहीत, याबद्दल खंत व्यक्त करतात, तरीही आम्ही एकमेकांना वेळ देण्याचा प्रयत्न करत असतो, असेही तिने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2016 3:15 am

Web Title: r balki movie ki ka
Next Stories
1 मराठी रंगभूमी ‘दीन’!
2 ‘रॉकी’ आणि ‘सम’ गुंडांचा कल्लोळ
3 ‘हा शेखर खोसला कोण आहे?’   
Just Now!
X