News Flash

आर. माधवनचा मुलगा गिरवणार बॉक्सिंगचे धडे!

अभिनेता आर. माधवन बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राच्या शोधात थायलंडला गेला होता.

बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी माधवनचा मुलगा दोन महिने एकटाच राहाणार आहे.

अभिनेता आर. माधवन सध्या आपल्या कुटुंबियांसोबत मलेशियामध्ये सुट्टीचा आनंद लूटतो आहे. तसेच तो एका उत्तम बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राच्या शोधात थायलंडलादेखील गेला होता. माधवनने ‘साला खडूस’ चित्रपटादरम्यान बॉक्सिंगचे प्राथमिक शिक्षण घेतले असले, तरी आपल्या मुलाने बॉक्सिंगचे व्यावसायिक पद्धतीचे शिक्षण घ्यावे, अशी त्याची इच्छा आहे. एनसीसी कॅडेट असलेल्या माधवनने सैनिकी प्रशिक्षणदेखील घेतले आहे. त्यामुळेच आपल्या मुलानेदेखील खेळातील उच्चतम प्रशिक्षण घ्यावे, असा त्याचा मानस आहे. बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी माधवनचा मुलगा दोन महिने एकटाच राहाणार आहे. आपण खूप आनंदित असल्याचे सांगत, माझ्या मुलाने स्वत:हून बॉक्सिंगसारखा कठीण खेळ शिकण्याची इच्छा व्यक्त केल्याचे तो म्हणाला. मुलाला बॉक्सरच्या अवतारात पाहून आपल्याला खूप समाधान मिळणार असल्याचेदेखील त्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2016 1:08 pm

Web Title: r madhavan enrolls his son in boxing training
टॅग : Boxing
Next Stories
1 ‘…तर सलमान खान शाहरूखचा स्टारपदाचा मुकूट हिरावून घेईल’
2 बाबांनी दिलेल्या आत्मशक्तीने बळ!
3 भावगीतांची नव्वदी
Just Now!
X