News Flash

ग्लॅमगप्पा : आर माधवन घायाळ

एके काळी हजारो तरुणींना घायाळ करणारा आर माधवन आज स्वत: घायाळ आहे.

आर माधवन

एके काळी हजारो तरुणींना घायाळ करणारा आर माधवन आज स्वत: घायाळ आहे. खांदय़ाच्या दुखापतीमुळे सध्या तो रुग्णालयात आहे. इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावरून त्याने स्वत:च ही माहिती दिली. ‘जिम’मध्ये एका यंत्रावर व्यायाम करताना त्याचे घडय़ाळ मनगटातून खाली पडले. त्या वेळी त्याचा हात त्या यंत्रात अडकून त्याच्या खांद्याला इजा झाली. मात्र, ही दुखापत जास्त गंभीर असल्याने त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. माधव याने इंस्टाग्रामवर चेहऱ्यावर हास्य असणारा सेल्फी जरी टाकला असला तरी या दुखापतीचा त्याला फारच त्रास होत असल्याचे एका सूत्राने सांगितले. त्याला डॉक्टरांनी पुढचे दोन महिने पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली असून तिसऱ्या महिन्यानंतर तो त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करायला सुरुवात करणार असल्याचे समजते आहे. पाचव्या महिन्यानंतर तो अ‍ॅक्शन सीक्वेन्सचेही चित्रीकरण करेल, असेही सूत्रांनी सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2018 3:39 am

Web Title: r madhavan injured
Next Stories
1 शब्दांच्या पलिकडले : ना कुछ तेरे बस में जूली…
2 श्रीदेवी यांचे पार्थिव ग्रीन एकर्समध्ये दाखल, उद्या दुपारी अंत्यसंस्कार
3 ‘जय जय महाराष्ट्र माझा’चे गुजराती व्हर्जन उपलब्ध आहे का?’
Just Now!
X