महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल ९०.६६ टक्के लागला असून यंदा कोकण विभागानं बाजी मारली आहे. दरम्यान बॉलिवूड अभिनेता आर माधवन यानं ट्विट करुन उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आहे. तसेच त्याने स्वत:चे मार्क सांगून कमी मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांना भविष्यासाठी प्रोत्साहीत केलं आहे.

अवश्य पाहा – “पत्नीचा मार खाऊन ४८ कोटी रुपये गमावल्यासारखं वाटलं”; अभिनेत्याचा कोर्टात अजब दावा

“बोर्डाच्या परिक्षेत चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा. उर्वरित मंडळींना मी सांगू इच्छितो की बारावीच्या परिक्षेत मला केवळ ५८ टक्के मिळाले होते. मित्रांनो खरा खेळ अद्याप सुरु झालेला नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन आर माधवन याने विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. सोशल मीडियावर सध्या बारावीच्या निकालाची चर्चा आहे या पार्श्वभूमीवर आर माधवनचं हे ट्विट सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – “केलेल्या पापांची याच जन्मात फळं भोगावी लागतील”; अभिनेत्याने केली सलमानवर टीका

राज्याचा निकाल ९०.६६ टक्के लागला असून यंदा कोकण विभागानं बाजी मारली आहे. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्याचा एकूण निकाल ४.७ टक्क्यांनी वाढला आहे. मुलींचा निकाल ९३.८८ टक्के तर मुलांचा निकाल ८८.४ टक्के लागला आहे. कला शाखाचे निकाल ८२.३३ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९१.२७ टक्के तर विज्ञान शाखेचा निकाल ९६.९३ टक्के लागला आहे. त्याशिवाय MCVC 95.07 टक्के निकाल लागला आहे.