News Flash

धोनीच्या मुलीला धमकी देणाऱ्याला अटक; आर. माधवनने केली कठोर शिक्षेची मागणी

धोनीच्या मुलीवर बलात्काराची धमकी देणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एम.एस. धोनीविरोधात अभद्र टिप्पणी करणाऱ्या आरोपीस गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. कोलकाता विरोधातील सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या झालेल्या पराभवामुळे आरोपीचं मानसिक संतुलन बिघडलं अन् त्याने सोशल मीडियाद्वारे धोनीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली. अशी धमकी देणाऱ्या आरोपीविरोधात अभिनेता आर. माधवन याने संताप व्यक्त केला आहे. आरोपीला कठोर शिक्षा द्या, अशी मागणी त्याने केली आहे.

अवश्य पाहा – “गटार स्वच्छ होतंय तर यांना त्रास काय?”; याचिका दाखल करणाऱ्यांवर कंगना संतापली

“एम.एस. धोनीच्या मुलीला धमकी देणाऱ्या आरोपीस पोलिसांनी पकडले आहे. पोलिसांनी खुप चांगलं काम केलं. या विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीला कठोर शिक्षा द्यावी. जेणेकरुन अशा धमक्या देण्याऱ्यांच्या मनात भीती निर्माण होईल. अन् पुढल्या वेळी अशी वक्तव्य करण्यापूर्वी ते एकदा विचार करतील.” अशा आशयाचं ट्विट करुन आर. माधवन याने आपला संताप व्यक्त केला आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – पहिल्याच आठवड्यात ‘ही’ अभिनेत्री ‘बिग बॉस’मधून बाहेर

गुजरात पोलिसांनी सायबर क्राइन अंतर्गत आरोपीला अटक केली आहे. लवकरच कच्छ पोलीस आरोपींना रांची पोलिसांकडे सपुर्द करणार आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, कच्छ पोलिसांनी अटक केलेला आरोपी अल्पवयीन आहे. सध्या तो बारावीमध्ये शिकत आहे. या आरोपीला कच्छमधील नामना कपाया या गावातून अटक केली आहे.

गुरुवार चेन्नई आणि कोलकाता यांच्यादरम्यान आयपीएलमधील सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात कोलकातानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत १६७ धावा केल्या होत्या. कोलकाताच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाचा १५७ धावांपर्यंत मजल मारली होती. चेन्नईचा अवघ्या १० धावांनी पराभव झाला होता. चेन्नईच्या पराभवानंतर आरोपीने रागाच्या भरात सोशल मीडियावरून धोनीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2020 12:43 pm

Web Title: r madhavan rape threats mahendra singh dhoni ziva mppg 94
Next Stories
1 फोटोतील ‘या’ चिमुकलीला ओळखलं का? आज आहे लोकप्रिय क्रिकेटपटूची पत्नी
2 “भावा असे करु नकोस, NCB घरी येईल”, शाहिदचा व्हिडीओपाहून नेटकऱ्यांची भन्नाट प्रतिक्रिया
3 “भोजपुरी गाण्यांमधील अश्लिलता थांबवा”; रवी किशन यांची योगी आदित्यनाथ यांना विनंती
Just Now!
X