30 November 2020

News Flash

बाबा का ढाबाच्या मालकाची फसवणूक? आर माधवनने ट्विट करत व्यक्त केली नाराजी

त्याचे हे ट्विट सध्या चर्चेत आहे.

दिल्लीतील मालविया नगर परिसरातील ‘बाबा का ढाबा’ सध्या प्रचंड चर्चेत आहे. युट्यूबवर गौरव वासन याने ढाब्याचा व्हिडीओ शूट केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि लोक मदतीसाठी पुढे येऊ लागले. पण आता गौरववर आर्थिक मदत चोरल्याचा आरोप ढाब्याचे मालक कांता प्रसाद यांनी केला आहे. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रारही केली आहे. आता या प्रकरणावर अभिनेता आर माधवनने प्रतिक्रिया दिली आहे.

नुकताच आर माधवनने ट्वटि करत नाराजी व्यक्त केली आहे. ‘बाबा का ढाबाचे मालक कांता प्रसाद यांची फसवणूक झाली? अशा गोष्टी लोकांना चांगले कार्य करण्यापासून थांबवतात. ज्याने कोणी फसवणूक केली आहे त्याला पोलिसांनी पकडले आणि शिक्षा दिली तर लोकांचा अशा गोष्टींवर पुन्हा विश्वास बसणार. माझा दिल्ली पोलिसांवर विश्वास आहे’ या आशयाचे ट्विट त्याने केले आहे.

काय होते कांता प्रसाद यांचे आरोप?
कांता प्रसाद यांनी केलेल्या आरोपानुसार, गौरवन लोकांना आपलं तसेच आपल्या कुटुंबाच्या बँक खात्याचा क्रमांक देत मिळणारी मदत वळती केली आणि ते पैसे परतही केले नाहीत. आता आपल्याला जास्त ग्राहकही मिळत नाही. आधी दिवसाला १० हजार कमवत होतो, आता ३ ते ५ हजारांचा व्यवसाय होतो. लोक जेवण्यासाठी कमी आणि फोटो काढण्यासाठी जास्त येत आहेत.

गौरवने आरोप खोटे असल्याचे म्हटले

कांता प्रसाद यांनी केलेल्या आरोपांवर गौरवनेही उत्तर दिलं असून सर्व आरोप निराधार आणि खोटे असल्याचं सांगितलं आहे. “माझ्याविरोधात खोटे आरोप करुन बदनामी केला जात आहे. माझ्या खात्यात २५ लाख रुपये जमा झाल्याचा दावा केला जात असून खोटा आहे. मी माझं बँक स्टेटमेंट दिलं असून सर्व पैसे कांता प्रसाद यांच्या खात्यात वळवले आहेत. मला २५ लाख रुपये मिळाल्याचं कांता प्रसाद यांच्या डोक्यात कोण भरवतंय माहिती नाही,” असं त्याने म्हटलं आहे

अशा पद्दतीने बदनामी झाल्यास लोकांचा माणुसकीवरुन विश्वास उठेल असं गौरवचं म्हणणं आहे. असे हजारो बाबा आणि अम्मा आहेत ज्यांना मदत हवी असून लोक माझ्या व्हिडीओनंतर मदत करत आहेत. पण अशा आरोपांमुळे या मदततीत खंड पडत आहे असंही तो म्हणाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 12:55 pm

Web Title: r madhavan tweeted about fraud at babas dhaba avb 95
Next Stories
1 ‘तारक मेहता…’मध्ये इतकी सुंदर पत्नी असणारे अय्यर खऱ्या आयुष्यात सिंगल
2 Video : महेश कोठारे -आदिनाथ पुन्हा एकत्र झळकणार?
3 ‘या शेफशी पंगा घेऊ नका, अन्यथा…’; पाहा वाऱ्याच्या वेगाने नानचक चालवणारा कुगफू शेफ
Just Now!
X