20 January 2018

News Flash

Raabta song Ik Vaaria Aa: सुशांत-क्रितीच्या प्रेमाचा नवा बाज

'इक वारी आ भी जा यारा..'

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: April 21, 2017 6:07 PM

राबता

तरुणाईच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अरिजित सिंगच्या आवाजातील ‘राबता’चे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘इक वारी आ भी जा यारा’ असे बोल असलेल्या या गाण्याला संगीतकार प्रितमने संगीतबद्ध केले असून, अमिताभ भट्टाचार्यच्या लेखणीतून हे गाणे साकारण्यात आले आहे.

अभिनेत्री क्रिती सनॉन आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्यावर हे गाणे चित्रीत करण्यात आले असून या दोघांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहण्याजोगी आहे. या गाण्यातील ‘चांद हू मै, तू है तारा’ ही ओळ अनेकांचेच लक्ष वेधत असून प्रेमीयुगुलं ज्याप्रमाणे प्रेमाच्या आणाभाका घेतात तशाच काहीशा परिस्थितीची जाणीव हे गाणं करुन देत आहे. या गाण्यातील बऱ्याच दृश्यांमध्ये क्रिती आणि सुशांत एकत्र दिसत नसूनही त्यांच्यात एक प्रकारचा बंध असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे चित्रपटाच्या ‘एव्हरिथिंग इज कनेक्टेड’ या टॅगलाइनची अनुभूती इथेही आल्यावाचून राहात नाही.

दिनेश विजन दिग्दर्शित ‘राबता’ हा चित्रपट येत्या ९ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सुशांत-क्रिती यांचे बहरणारे प्रेम प्रेक्षकांची पसंती मिळवते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या चित्रपटामध्ये विविध काळ साकारण्यात आल्यामुळे या कालचक्रामध्ये एकाच वेळी दोन प्रेमकथा अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. सुशांत आणि क्रितीव्यतिरिक्त या चित्रपटात अभिनेता राजकुमार रावही झळकणार आहे. ‘राबता’मध्ये साकारण्यात आलेल्या पुरातन काळातील काही दृश्यांमध्ये राजकुमार चक्क ३२४ वर्षांचा दाखविण्यात आला आहे. सध्या त्याचा या चित्रपटातील लूक सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.

First Published on April 21, 2017 6:07 pm

Web Title: raabta movie song ik vaaria aa starer sushant singh rajput kriti sanon celebrate love video
  1. No Comments.