11 December 2017

News Flash

… या बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?

बॉलिवूडचा हा हरहुन्नरी अभिनेता चक्क ३२४ वर्षांचा दाखविण्यात आला आहे.

मुंबई | Updated: April 21, 2017 12:29 PM

'राबता'च्या ट्रेलरमध्ये राजकुमार रावचीही झलक दिसली होती.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री क्रिती सनॉन यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘राबता’ या चित्रपटाचा ट्रेलर गेल्याच आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला. दोन वेगवेगळ्या काळांचे दर्शन घडवणाऱ्या या ट्रेलरमध्ये एकीकडे सुशांत स्क्रिनवर क्रितीसोबत फ्लर्ट करताना दिसत असतानाच दुसरीकडे तो एखाद्या योद्ध्याप्रमाणे लढताना दिसत होता.

‘राबता’ हा चित्रपट दोन विविध काळांवर आधारित असून, यामध्ये २१ वे शतक आणि पुरातन काळ दाखविण्यात आलाय. यातील पुरातन भागातील कथेत बॉलिवूडचा एक हरहुन्नरी अभिनेता चक्क ३२४ वर्षांचा दाखविण्यात आला आहे. विक्रमादित्य मोटवानीच्या ‘ट्रॅप’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वांची प्रशंसा मिळवणारा अभिनेता राजकुमार राव पुन्हा एकदा त्याच्या अभिनय कौशल्याची छाप पाडण्यास सज्ज झाला आहे. यावेळी तो चक्क ३२४ वर्षांच्या वृद्ध व्यक्तीच्या भूमिकेत दिसेल. ‘राबता’च्या ट्रेलरमध्ये राजकुमार रावचीही झलक दिसली होती. पण, त्याला कोणीच ओळखले नसेल याबाबत काहीच शंका नाही. ट्रेलरच्या शेवटी एका वयोवृद्ध माणसाची झलक दाखविण्यात आलेली. अंगावर टॅटू असलेला तो व्यक्ती म्हणजे खुद्द राजकुमार राव आहे. चित्रपटातील फोटो शेअर करत राजकुमारने ट्विटवर लिहलंय की, ”राबता’मध्ये मी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकरतोय.’

राजकुमारसाठी हा लूक प्रत्यक्षात उतरवणं काही सोपं काम नव्हतं. योग्य लूक मिळवण्यासाठी चित्रपटाच्या टीमने राजकुमारच्या तब्बल १६ लूक टेस्ट घेतल्या होत्या. तसेच, या लूकसाठी लॉस एंजेलिसवरून एक खास टीमही बोलवण्यात आली होती. या लूककरिता मेकअप करण्यासाठी राजकुमारला जवळपास पाच ते सहा तास एकाच जागी बसावे लागत होते. पण, तरीही तो रोज संयमाने मेकअप करण्यासाठी बसायचा, असे दिग्दर्शक दिनेश विजन याने सांगितले. लूकप्रमाणेच राजकुमारच्या शरीरयष्टीवर आणि आवाजावरही काम करण्यात आलाय.

राजकुमारप्रमाणेच याआधी ऋषी कपूर यांनीही ‘कपूर अॅण्ड सन्स’, अक्षय कुमारने ‘२.०’ तर अमिताभ बच्चन यांनी ‘पा’ चित्रपटासाठी त्यांच्या लूकमध्ये बदल केले होते.

First Published on April 21, 2017 12:29 pm

Web Title: raabta rajkummar rao plays 324 year old man