News Flash

Raat Akeli Hai Trailer: नवाजुद्दीन सिद्दिकी उलगडणार मर्डर मिस्ट्री

"नाव लक्षात ठेवा इनस्पेक्टर जटिल यादव"

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर विशेष छाप सोडणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आता एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव ‘रात अकेली है’ असं आहे. हा एक क्राईम मिस्ट्री प्रकारातील चित्रपट आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे.

अवश्य पाहा – १२वीत कमी मार्क मिळाल्यामुळे अभिनेत्री नाराज; ‘या’ कारणामुळे झाला नव्हता अभ्यास

अवश्य पाहा – खरा सुपरहिरो! ‘या’ सहा वर्षांच्या मुलाला मार्व्हलने दिली ‘कॅप्टन अमेरिका’ची शिल्ड

‘रात अकेली है’ या चित्रपटाचं कथानक जटिल यादव नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याभोवती फिरते. ही मुख्य व्यक्तिरेखा नवाजुद्दीन सिद्दिकीने साकारली आहे. एका नामांकित नेत्याचा खून झाला आहे. या खूनाच्या चौकशीची जबाबदारी जटिल यादववर सोपवण्यात आली आहे. आता हा खून कोणी केला? का केला? खरंच हा खून आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तर नवाजुद्दीन सिद्दिकी या चित्रपटात शोधणार आहे.

लक्षवेधी कथानक आणि जबरदस्त स्टार कास्ट हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हटलं जात आहे. यामध्ये नवाजसोबत राधिका आपटे, स्वानंद किरकिरे, आदित्य श्रीवास्तव, तिग्मांशू धूलिया, पद्मावती राव, शिवानी रघुवंशी असे दर्जेदार कलाकार झळकणार आहेत. हा चित्रपट येत्या ३१ जुलै रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 12:17 pm

Web Title: raat akeli hai trailer nawazuddin siddiqui radhika apte mppg 94
Next Stories
1 “रणबीर व आलियापेक्षा चांगले कालाकर शोधून दाखवा,” दिग्दर्शकाने व्यक्त केला संताप
2 महाराष्ट्र पोलिसांना सोनू सूदकडून अनोखी भेट; गृहमंत्र्यांनी मानले आभार
3 ‘बच्चन सरांना संसर्ग होऊ शकतो तर…’ जेठालालने पुन्हा शुटिंग सुरु होण्यावर व्यक्त केली भीती
Just Now!
X