News Flash

‘राजी’च्या यशानंतरही मेघना गुलजार यांच्या डोळ्यात पाणी !

मेघना गुलजार यांच्या आयुष्यातील एका खास व्यक्तीमुळेच हे अश्रू आल्याचे सांगण्यात येत आहे.

मेघना गुलजार

अभिनेत्री आलिया भटच्या ‘राजी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असून पहिल्या सहा दिवसांमध्येच चित्रपटाने ५१.२४ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. मात्र या यशामागे कलाकारांबरोबरच चित्रपटाच्या संपूर्ण टीमने अथक प्रयत्न आहेत. ‘राजी’ यशाचे शिखर गाठत असताना चित्रपटाच्या दिग्दर्शिका मेघना गुलजार यांच्या डोळ्यात मात्र अश्रू दिसून आले. विशेष म्हणजे मेघना गुलजार यांच्या आयुष्यातील एका खास व्यक्तीमुळेच हे अश्रू आल्याचे सांगण्यात येत आहे.

‘राजी’ चित्रपटाचे यश पाहता संपूर्ण टीमने एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला मेघना गुलजारचे वडील, ज्येष्ठ गीतकार गुलजारही उपस्थित होते. पार्टीत आपल्या मुलीचे गुलजार यांनी तोंड भरुन कौतुक केले. त्यावेळी मेघनाच्या डोळ्यात अश्रू तरळले. तो क्षण सर्वांनाच भावूक करुन गेला.

‘चित्रपटांचा दर्जा टिकवण्यासाठी ही पिढी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. खरंतर ही फार आनंदाची गोष्ट आहे. अशा चित्रपटांच्या निर्मितीमुळेच चित्रपटांचा दर्जा टिकून राहणार आहे. अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी जे प्रयत्नशील आहेत अशा दिग्दर्शक, निर्मात्यांचा हात धरुन त्यांना आणखी पुढे जाण्यासाठी मदत करावी’ अशी इच्छा असल्याचे गुलजार यांनी यावेळी सांगितले.
इथेच न थांबता ते पुढे असेही म्हणाले, ‘मेघनाने केलेला हा चित्रपट उत्कृष्ट असून ती माझी मुलगी असल्याचे मला समाधान आहे’. गुलजार यांचे हे शब्द ऐकताच मेघना यांना स्टेजवरच रडू कोसळले. मेघना यांनी यापूर्वी ‘तलवार’ सारखा यशस्वी चित्रपट केला आहे. यानंतर ‘राजी’ या चित्रपटानेदेखील यश संपादन केले. वेगळ्या धाटणीचे चित्रपट करण्याकडे मेघनाचा कल असल्याचे अनेक वेळा दिसून आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2018 1:25 pm

Web Title: raazi box office collection success gulzar meghna gulzar
Next Stories
1 VIDEO : KKRच्या परदेशी खेळाडूंना शाहरुखची डायलॉगबाजी ऐकवली तेव्हा…
2 ‘या’ मराठी नाटकाच्या ७०० व्या प्रयोगाला असणार आमिर खान आणि नागराज मंजुळे यांची उपस्थिती
3 ‘ऐ मेरे वतन के लोगों’ गाण्यासाठी पंकज उधास यांना मिळाली अशी दाद !
Just Now!
X