21 March 2019

News Flash

बॅकग्राऊंड डान्सरपासून ते मुख्य नायिकेपर्यंत डेझीची ‘रेस’

डेझी ही १० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'रेस' या चित्रपटात बॅकग्राऊंड डान्सर होती. डेझीचा सलमानसोबतचा हा दुसरा चित्रपट आहे.

'रेस ३' चे पोस्टर मी पाहते तेव्हा दहा वर्षांचा प्रवास माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो.

‘रेस ३’ चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सर्वाधिक खिल्ली जर कोणाची उडवली गेली तर ती होती डेझी शहा हिची. ‘our business is our business none of your business’ असं म्हणणारी डेझी ही तेव्हापासून सोशल मीडियावरच्या ट्रोलिंग आणि मीम्सचा विषय ठरली आहे. अर्थात डेझीनं या ट्रोलिंगकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे. काही वर्षांपूर्वी पडद्यामागे वावरणाऱ्या डेझीचा मुख्य अभिनेत्रीपर्यंतचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. अनेकांना कदाचित माहितीही नसेल की डेझी ही १० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘रेस’ या चित्रपटात बॅकग्राऊंड डान्सर होती.

डेझीनं नुकत्याच एका मुलाखतीत तिच्या स्ट्रगलच्या काळातील काही अनुभव सांगितले होते. या मुलाखतीत आपण ‘रेस’ चित्रपटात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केल्याचं तिनं कबुल केलं होतं. ‘रेस ३’ चे पोस्टर मी पाहते तेव्हा दहा वर्षांचा प्रवास माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. दहा वर्षांपूर्वी याच चित्रपटासाठी मी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं होतं. मी बॅकग्राऊंड डान्सर होते. आज बॉलिवूडमधल्या मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली आहे ही माझ्यासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे असंही ती म्हणाली.

कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्या हाताखाली नृत्य दिग्दर्शनाचे धडे घेतलेल्या डेझीचा सलमानसोबतचा हा दुसरा चित्रपट आहे. २००३ मध्ये आलेल्या तेरे नाम चित्रपटातही डान्सर म्हणून डेझीनं काम केलं आहे. ‘जय हो’ या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण डेझीच्या पदरात फारसं यश आलं नाही. त्यामुळे ‘रेस ३’ चित्रपटात मुख्य भूमिका मिळालेली डेझी करिअरच्या रेसमध्ये किती पुढे जाते हे पाहण्यासारखं ठरेल.

First Published on June 14, 2018 5:04 pm

Web Title: race 3 leading lady daisy shah was also a part of the 2008 film race