01 March 2021

News Flash

‘रेस ३’ चा मेकिंग व्हिडिओ पाहिलात का?

त्यातच चित्रपटातील ट्रेलर आणि टीझर प्रदर्शित झाल्यानंतर तर प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

रेस ३

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘रेस ३’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये एकापेक्षा एक अशा सरस कलाकारांची मांदियाळी बघायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातच चित्रपटातील ट्रेलर आणि टीझर प्रदर्शित झाल्यानंतर तर प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. यात भर घातली आहे ती चित्रपटाच्या मेकिंग व्हिडिओने. ‘रेस ३’ चा मेकिंग व्हिडिओ नुकताच प्रदर्शित झाला आहे.

बॉलिवूडच्या भाईजानने हा मेकिंग व्हिडिओ युट्युब चॅनेलवर अपलोड केला आहे.  ‘रेस ३’ या चित्रपटामध्ये अनेक साहसदृश दाखविण्यात आली आहेत. त्यामुळे हे सीन वास्तवदर्शी वाटावेत यासाठी चित्रपट निर्मात्यांनी पूरेपुर प्रयत्न केल्याचे दिसते. विशेष म्हणजे चित्रपट वास्तवदर्शी व्हावा यासाठी एका साहसदृशामध्ये काही गाड्यांचा स्फोटही करण्यात आला असून गाड्यांच्या हा स्फोट पाहून पाहणा-याच्या अंगावर काटा उभा राहतो.

तसेच या चित्रपटातील एक सीन अबूधाबीमध्ये शूट करण्यात आला असून तेथील प्रचंड उकाड्यात बॉबी देओल आणि अनिक कपूर शर्टलेस होऊन चित्रीकरण करत असल्याचे दिसून येत आहे. उन्हाच्या झळांमध्ये  चित्रीकरण पूर्ण झाल्यावर दोघंही रॉल्स रॉयल गाडीतील एसीचा आधार घेत असल्याचे यावेळी पहायला मिळाले. चित्रीकरण संपल्यावर अनिल कपूर आणि  बॉबी देओल दोघेही गाडी जाऊन बसत असे. त्यामुळे रॉल्स रॉयल ही आलिशान गाडी ते केवळ एसीपूरतीच वापरत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून आले.

व्हिडिओमध्ये रेमो डिसूझा यांनी त्यांच्या बालपणीची आठवणही शेअर केली आहे. लहानपणी मला आलिशान गाड्यांची खूप हौस होती. त्यावेडापायी मी घरातही आलिशान गाड्यांचे फोटो सर्वत्र लावले होते. याच आवडत्या गाड्यांचा वापर मी रेस ३ या चित्रपटात करणार आहे. त्यामुळे या चित्रपटात सर्व मोठे ब्रॅण्ड आणि गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे, असे रेमो यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 1:11 pm

Web Title: race 3 making video salman khan became director
Next Stories
1 राज कपूर- नर्गिसच्या पहिल्या भेटीचा रंजक किस्सा माहितीये?
2 माझ्या जन्माच्या आधीच आई गर्भपात करणार होती, भारती सिंगचा धक्कादायक खुलासा
3 आलियासाठी रणबीरची बहिणही ‘राजी’, भावाच्या गर्लफ्रेण्डला दिलं खास गिफ्ट
Just Now!
X