News Flash

‘रेस ३’मध्ये पुन्हा एकदा सलमान- मिकाची जादू चालणार

ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सलमान खान, जॅकलिन फर्नांडिस, बॉबी देओल

बॉलिवूडचा ‘दबंग’ खान अर्थात सलमान आणि गायक मिका सिंग प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. सलमानच्या आगामी ‘रेस ३’ या चित्रपटाच्या निमित्ताने मिकाच्या आवाजाची जादू पुन्हा एकदा चालणार आहे. कारण यामधील ‘पार्टी चले ऑन’ हे गाणं मिकाच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलं आहे. सलमान आणि मिका ही जोडी याआधाही बऱ्याच सुपरहिट गाण्यांसाठी पाहिली गेली. मिकाच्या आवाजातील गाणं सलमानसाठी नेहमीच हिट ठरतं असं म्हणायला हरकत नाही.

‘रेडी’मधील ढिंका- चिका, ‘बॉडीगार्ड’मधील देसी बीट, ‘किक’मधील जुम्मे की रात आणि ‘बजरंगी भाईजान’मधील आज की पार्टी यांसारख्या गाण्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आता पुन्हा एकदा ‘रेस ३’मधल्या पार्टी चले ऑन या गाण्याच्या निमित्ताने सलमान आणि मिका चाहत्यांना थिरकण्यास भाग पाडणार आहेत.

वाचा : स्टार प्रवाहवर येतेय ‘छत्रीवाली’

या पार्टी साँगमध्ये चित्रपटातील सर्व कलाकार एका क्लबमध्ये  ठेका धरताना पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे या गाण्यात सलमानची कथित प्रेयसी लूलिया वंतूरनेही मिकाला साथ दिली आहे. अॅक्शन आणि थरारने परिपूर्ण अशा ‘रेस ३’ची शूटिंग थायलंड, अबू धाबी आणि मुंबईत पूर्ण झाली. सलमानचा हा चित्रपट बॉक्स ऑफीसचे रेकॉर्ड तोडू शकणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये सलमानसोबतच जॅकलिन फर्नांडिस, अनिल कपूर, डेझी शाह, बॉबी देओल आणि साकिब सलीम यांच्याही भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 5:00 pm

Web Title: race 3 new song party chale on by mika singh salman khan iulia vantur
Next Stories
1 ‘या’ व्यक्तीच्या येण्यामुळे शिल्पाचा वाढदिवस झाला खास
2 स्टार प्रवाहवर येतेय ‘छत्रीवाली’
3 नितीन गडकरींनी घेतली नाना पाटेकरांची भेट
Just Now!
X