21 March 2019

News Flash

रात्री २ वाजताचा सलमानचा स्टंट पाहिलात का?

अब्बास अली जफरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून सलमानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सलमान स्टंट करताना दिसतो.

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा आगामी ‘रेस ३’ हा सिनेमा सध्या पार चर्चेत आहे. या सिनेमातील व्यक्तिरेखांची ओळख देणारी पोस्टर्स आणि एक टीझरही प्रदर्शित झाला आहे. या सिनेमातील सलमानचा लूकही त्याच्या चाहत्यांना पसंत पडला आहे. नुकतेच ‘रेस ३’ सिनेमाचा दिग्दर्शक अब्बास अली जफरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून सलमानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सलमान स्टंट करताना दिसतो. सलमान या स्टंटमध्ये हवेत उडी मारताना दिसत आहे.

हा स्टंट पाहून सलमान सिनेमातील एखाद्या दृश्याचा सराव करत आहे असेच वाटते. पण या व्हिडिओचे कॅप्शन पाहूनच पुढील गोष्टी कळून येतात. अलीने लिहिले की, ‘पाहा.. सलमान भाई मला काय मिळालं… सुलतान सिनेमाच्या ट्रेनिंगवेळचा एक व्हिडिओ मिळाला.’ अलीने हा व्हिडिओ सुलतान सिनेमाच्या ट्रेनिंग सेशनमध्ये काढलेला. तेव्हा सलमान रात्री २ वाजताही सिनेमाची तयारी करत होता. ‘रेस ३’ या सिनेमात जॅकलिन फर्नांडिस, अनिल कपूर, डेजी शहा आणि बॉबी देओल यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. यावर्षी ईदला हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे.

First Published on April 16, 2018 5:47 pm

Web Title: race 3 salman khan throwback video shared by director ali abbas zafar from the movie sultan watch here the stunt by sultan salman khan