17 January 2021

News Flash

‘या’ कारणामुळे सलमानने मानले चाहत्यांचे आभार!

हा चित्रपट या आठवड्यापर्यंत २०० कोटींचा गल्ला सहज पार करेल असंही भाकीत वर्तवण्यात येत आहे.

सलमान खान

बहुचर्चित ठरलेला ‘रेस ३’ हा चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. सलमान खान, जॅकलीन फर्नांडिस, बॉबी देओल यासारख्या कलाकारांना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे या चित्रपटाने केवळ पहिल्या दोन दिवसांमध्येच २७.६९कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता हा चित्रपट २०० कोटी रुपयांचा आकडा सहज पार करेल असं सांगण्यात येत आहे. प्रेक्षकांचा हा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता सलमाननेही चाहत्यांचे आभार मानले आहेत.

‘रेस ३’ चित्रपटगृहात जाऊन पाहणा-या प्रेक्षकांचे सलमानने मनापासून आभार मानले असून त्याने आभार मानण्यासाठी ट्विटरचा आधार घेतला आहे. ‘चित्रपटगृहात जाऊन ‘रेस ३’ पाहणा-या प्रत्येक प्रेक्षकाचे मी मनापासून आभार मानतो. चित्रपटावर तुम्ही दाखविलेल्या याच प्रेमामुळे ‘रेस ३’ यशाचं शिखरं सर करत आहे. तुम्ही चित्रपटाला जे प्रेम देता ते पाहून मला मनस्वी आनंद होत आहे. त्यामुळे या चित्रपटावर असंच प्रेम राहू द्या, असं ट्वीट करत सलमानने चाहत्यांचे आभार मानले आहेत.

‘रेस ३’ प्रदर्शित झाल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा चित्रपट लवकरच बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात गल्ला जमवेल असे संकेत देण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2018 1:38 pm

Web Title: race 3 star salman khan took to twitter to wrote a heartfelt note for his massive fan base
Next Stories
1 आजारपणाला कंटाळलेल्या इरफानला शाहरुख करतोय अशी मदत
2 Social Viral : वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी मुंबई पोलिसांची ‘धडक’ मोहिम
3 ..आणि ‘फन्ने खान’ मधील गाण्यात झाला असा बदल!
Just Now!
X