29 November 2020

News Flash

‘राधा प्रेम रंगी रंगली’ फेम अभिनेत्री अर्चना निपाणकर विवाहबद्ध

कलाकारांनी दिल्या शुभेच्छा

अर्चना निपाणकर व पार्थ रामनाथपूर

‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेत भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अर्चना निपाणकर हिने लग्नगाठ बांधली. पार्थ रामनाथपूर आणि अर्चना गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अर्चनाने या लग्नाचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.

कांजीवरम साडीतील अर्चना या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे. तर पार्थसुद्धा दाक्षिणात्य पोशाखात पाहायला मिळत आहे. अभिनेत्री सायली संजीव, जुई गडकरी, वीणा जगताप, तितिक्षा तावडे, अभिजीत खांडकेकर यांसारख्या कलाकारांनी या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Archana (@archananipankar) on

आणखी वाचा : दोनाचे चार हात; लॉकडाउनच्या काळात ‘या’ मराठी कलाकारांची जमली जोडी

जानेवारीमध्ये अर्चना व पार्थ यांचा साखरपुडा पार पडला होता. त्याचेही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. कॉलेजमध्ये असल्यापासून हे दोघं एकमेकांना ओळखत होते आणि इतर मित्रांच्या ओळखीने या दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर अर्चना व पार्थ एकमेकांच्या प्रेमात पडले. पण हे रिलेशनशिप फार काळ टिकलं नव्हतं. तेव्हा त्यांनी ब्रेकअप केलं. काही वर्षांनंतर ‘का रे दुरावा’ या मालिकेच्या शूटिंगसाठी अर्चना मुंबईला आली आणि पुन्हा एकदा या दोघांमध्ये जवळीक वाढली. अखेर आता लॉकडाउनमध्ये दोघांनी लग्न करण्याचा विचार केला.

अर्चनाने ‘का रे दुरावा’ या मालिकेतून कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर ती ‘१०० डेज’ या मालिकेत झळकली. ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेत तिने दीपिकाची भूमिका साकारली. मालिकांसोबतच तिने मराठी व हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 4:07 pm

Web Title: radha prem rangi rangli fame archana nipankar gets hitched to beau parth ramnathpur ssv 92
Next Stories
1 डायना पेंटीने दीपिकासाठी लिहिली खास पोस्ट; म्हणते…
2 “जगाचा अंत होत आला तरी बिग बॉसमध्ये जाणार नाही”; अभिनेत्याने चर्चांवर दिला पूर्णविराम
3 कंगना रणौतच्या ‘या’ बॅगची किंमत वाचून तुमचे डोळे विस्फारतील!
Just Now!
X