News Flash

सलमानला दिशा म्हणाली ‘स्वीट’; जॅकी श्रॉफ बोलले ‘सुना तू बहुत डेंजरेस है…..!’

....आणि अभिनेत्री दिशा पाटनी सलमान प्रेमी झाली !

१३ मे ही तारीख सलमान प्रेमींसाठी एका सणाप्रमाणेच ठरणार आहे. कारण या दिवशी बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खान याची बहूचर्चित ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला प्रदर्शित होण्यासाठी अवघे काही दिवस उरले असताना प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी फिल्म मेकर लागोपाठ नव नवे गाणे आणि प्रोमो रिलीज करत आहेत. ‘राधे’ चित्रपटाच्या टायटल ट्रॅकनंतर चित्रपटाचा नवा डायलॉग प्रोमो रिलीज करण्यात आलाय. यात अभिनेत्री दिशा पटानी सलमानची बरीच चाहती झालेली दिसून आली.

या डायलॉग प्रोमोमध्ये अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री दिशा पटानी यांच्यामधले संवाद दाखवण्यात आले आहेत. तर दुसऱ्या डायलॉग प्रोमोमध्ये अभिनेता जॅकी श्रॉफ आणि सलमान खान यांच्यामध्ये तू-तू मै-मै झालेली दिसून येतेय. या दोन्ही डायलॉग प्रोमोला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळतेय.

सलमान दिशाला म्हणाला ‘स्वीट’…
पहिल्या डायलॉग प्रोमोमध्ये अभिनेत्री दिशा पटानी सलमानच्या स्वभावामुळे भलतीच सलमान प्रेमी झालेली दिसून येतेय. अभिनेता सलमान खानचं कौतूक करत असताना ती त्याला ‘स्वीट’ म्हणालेली दाखवण्यात आलंय. प्रोमोच्या सुरवातीला एक व्यक्ती पडताना दिसतोय, सलमान त्याला सावरतो, आणि दिशा तिच्या गाडीतून उतरून धावत सलमानकडे जाते, दिशा म्हणजेच प्रोमोमधली दिया म्हणते, ” आज के जमाने में जब किसी के पास किसी के लिए टाइम नहीं है, तुम इतनी तकलीफ उठाकर अनजान लोगों की मदद करते हो.” यावर उत्तर देताना सलमान म्हणजेच राधे बोलतो, ”ये मेरा नेचर है.” राधेचा हा स्वभाव दियाला आवडतो आणि ती त्याला ‘स्वीट’ म्हणते. या व्हिडीओमध्ये सलमान खान आणि दिशा पटानी दोघांच्या डान्सची झलक ही पहायला मिळतेय.

तर दुसऱ्या डायलॉग प्रोमोमध्ये अभिनेता जॅकी श्रॉफ आणि अभिनेता सलमान खान या दोघांमधले संवाद पहायला मिळतात. यात जॅकी श्रॉफ आणि सलमान खान या दोघांमधली टॉम-जेरी सारखे खटके उडालेली पहायला मिळतेय. ‘सुना तू बहुत डेंजरेस है’, असं जॅकी श्रॉफ सलमानला बोलताना या डायलॉग प्रोमोमध्ये दिसतंय.

13 मे ला ‘राधे :योर मोस्ट वांटेड भाई’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये सलमानसोबत दिशा पाटनी, रणदीप हुड्डा आणि जैकी श्रॉफ प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहे. या चित्रपटांमधील गाण्यांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सूरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2021 8:32 pm

Web Title: radhe dialogue promo starring salman khan disha patani jackie shroff prp 93
Next Stories
1 अर्सलच्या पोस्टवर सुझानच्या कमेंटने वेधले सगळ्यांचे लक्ष
2 नवी नवरी कॉमेडियन सुगंधा मिश्रावर गुन्हा दाखल ; लग्नाच्या व्हायरल व्हिडीओमुळे आली अडचणीत
3 “परत भोपळे चौक अवस्था”, फोटो शेअर करत प्राजक्ता माळी म्हणाली “परंतू करोनाने..”
Just Now!
X