21 January 2021

News Flash

अंतिम! लवकरच सुरु होणार ‘मुळशी पॅटर्न’ रिमेकचं चित्रीकरण; भाईजान दिसणार मुख्य भूमिकेत

जाणून घ्या, भाईजानच्या आगामी चित्रपटाविषयी

बॉलिवूडचा भाईजान सलामान खानचा ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकतंच सलमानने या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं असून तो त्याच्या आगामी चित्रपटांकडे वळला आहे. त्यामुळे आता भाईजान ‘मुळशी पॅटर्न’च्या रिमेककडे वळणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

प्रविण विठ्ठल तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आता या चित्रपटाचा रिमेक करण्यात येणार असून सलमान खान या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या रिमेकचं नाव ‘गन्स ऑफ नॉर्थ’ असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, आता या चित्रपटाचं नाव ‘अंतिम’ असं निश्चित करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

‘अंतिम’ या चित्रपटात सलमान पोलिसांच्या भूमिकेत झळकणार आहे. तर सलमानचा मेहुणा आयुष शर्मा निगेटिव्ह भूमिकेत असल्याचं पाहायला मिळणार आहे. तसंच या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, ‘राधे’ चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर ‘सलमान टायगर जिंदा है’च्या तिसऱ्या भागाच्या चित्रीकरणास सुरुवात करणार होता. मात्र, काही कारणास्तव हे चित्रपट लांबणीवर पडलं आहे. त्यामुळे भाईजान आता ‘अंतिम’च्या चित्रीकरणास सुरुवात करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 7:31 pm

Web Title: radhe wrap salman khan begin aayush sharma co starrer antim mahesh manjrekar november dcp 98 ssj 93
Next Stories
1 “वेळ आणि जागा सांग मी एकटा येतो”; सलमान खानला अभिनेत्याचं आव्हान
2 Video : विकी कौशल दिसताच चाहतीने धरला हट्ट; म्हणाली…
3 कमाल केली… चित्रपटातील अंडरवॉटर सीनसाठी अभिनेत्रीने सात मिनिटं रोखला श्वास
Just Now!
X