News Flash

कुठे आणि किती वाजता बघता येणार सलमानचा ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’ ?

निवडक थिएटर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतोय चित्रपट

बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खानच्या चाहत्यांसाठी उद्याचा दिवस काही सणापेक्षा कमी नाही. कारण गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला सलमानचा ‘राधे’ चित्रपट उद्या प्रदर्शित होतोय. ईदच्याच दिवशी त्याचा चित्रपट प्रदर्शित करण्याची कमिटमेंट त्याने त्याच्या चाहत्यांना केली होती. उद्या अखेर त्याने केलेली कमिटमेंट पूर्ण होतेय. लॉकडाउनमुळे अनेक ठिकाणी हा चित्रपट थिएटरमध्ये दाखवला जाणार नाही, परंतू त्या ठिकाणी डिजीटल प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. म्हणूनच कुठल्या ठिकाणी किती वाजता हा चित्रपट तुम्हाला बघता येणार आहे, याचीच माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

ज्या ठिकाणी लॉकडाउन सुरू आहे अशा ठिकाणच्या थिएटरमध्ये हा चित्रपट दाखवण्यात येणार नाही. ज्या ठिकाणी लॉकडाउन नसल्याने थिएटर्स सुरू आहेत अशा ठिकाणच्या थिएटर्समध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. ज्या ठिकाणी थिएटरमध्ये हा चित्रपट बघता येणार नाही अशा ठिकाणी ओटीटी प्लॅटफॉर्म आणि डिश टीव्ही वरून हा चित्रपट बघण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan Films (@skfilmsofficial)

Zee5 अ‍ॅपवर दिलेल्या माहितीनुसार, ‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट उद्या (१३ मे) दुपारी 12 वाजता स्ट्रीम करण्यात येणार आहे. परंतू चित्रपट पाहण्यासाठी यूजरला Zeeplex या ऑप्शनवर जावं लागणार आहे, या ठिकाणी ‘राधे’ चित्रपट स्क्रीनिंगसाठी उपलब्ध होणार आहे. Zeeplex वर चित्रपट पाहण्यासाठी एक ठराविक चार्जेस भरावे लागतात. यासाठी युजरला आधी Zee5 अ‍ॅपमध्ये लॉग इन करावं लागणार आहे आणि नंतर Zeeplex हा ऑप्शन निवडावा लागणार आहे. त्यानंतर पेमेंट पेजवर जाऊन पेमेंट मोड निवडा आणि चार्जेस भरा. अॅपवर दिलेल्या माहितीनुसार ही किंमत ४९९ इतकी ठेवण्यात आली आहे. ट्रान्सेक्शन झाल्यानंतरच तुम्हाला हा चित्रपट बघता येणार आहे. तसंच चार्जेस भरून हा चित्रपट पाहिल्यानंतर वर्षभर झी ५ आणि इतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोफत लाभ घेण्याची मुभा देखील देण्यात आलीय.

‘राधे’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने U/A सर्टिफिकेट दिलंय. म्हणजेच हा चित्रपट प्रेक्षक त्यांच्या कुटूंबासोबत पाहू शकतील. ५७ मिनिटांचा हा चित्रपट आहे, असं बोललं जातंय. ‘दबंग’ अभिनेता सलमान खानचा ‘राधे’ हा आतापर्यंचा सगळ्यात लहान चित्रपट ठरला आहे.

तसंच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केलेला हा सलमान खानचा पहिला चित्रपट असणार आहे. शिवाय इतर देशात ७०० पेक्षा जास्त स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रभूदेवा दिग्दर्शित ‘राधे’ हा चित्रपट एक अ‍ॅक्शन ड्रामा आहे. या चित्रपटाची कथा मुंबईभोवती फिरते. सलमान खान एका पोलिसाच्या भूमिकेत दाखवण्यात आलाय, जो मुंबईतल्या ड्रग्ज माफियांच्या विरोधात लढतो. या चित्रपटात दिशा पाटनी, रणदीप हुड्डा, जॅकी श्रॉफ यांच्यासोबतच मराठमोळे कलाकार सिद्धार्थ जाधव आणि प्रवीण तरडे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 7:43 pm

Web Title: radhe your most wanted bhai release time salman khan disha patani film to stream prp 93
Next Stories
1 मलायकाने केला अनुराग बासूसोबत डान्स, व्हिडीओ व्हायरल
2 “असे मित्र जोडा जे तुम्हाला तुमची पातळी वाढवण्यास भाग पाडतील.” : स्नेहलता वसईकर
3 Indian Idol 12: अमित कुमार यांच्यावर भडकला आदित्य नारायण; शो आवडला नाही तर आधीच तसं सांगायचं….
Just Now!
X