बॉलिवूडचा भाईजान सलमान खान एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ असं आहे. या चित्रपटाला ऑनलाईन प्रदर्शित करण्यासाठी तब्बल २५० कोटी रुपयांची ऑफर मिळाली होती. परंतु सलमाननं ओटीटीला साफ नकार दिला आहे. हा चित्रपट कुठल्याही परिस्थितीत थिएटरमध्येच प्रदर्शित होईल, अशी भूमिका त्याने घेतली आहे.

अवश्य पाहा – ‘नग्न असताना मला अधिक आध्यात्मिक वाटतं’; टीकाकारांवर सोफिया संतापली

‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रभू देवाने स्विकारली आहे. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत त्याने या चित्रपटावर भाष्य केलं. तो म्हणाला, “करोनामुळे अनेक चित्रपटांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शिवाय थिएटर देखील बंद आहेत. त्यामुळे काही निर्मात्यांनी आपले चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले. मात्र सलमान हा मोठ्या पडद्यावरील सुपरस्टार आहे. चाहत्यांना त्याला मोठ्या पडद्यावरच पाहायला आवडतं. राधेला ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी २५० कोटी रुपयांची ऑफर मिळाली होती. परंतु आम्ही त्यास नकार दिला. कितीही नुकसान झालं तरी चालेल पण सलमान चाहत्यांसाठी मोठ्या पडद्यावरच येणार अशी भूमिका आमच्या टीमनं घेतली आहे.”

अवश्य पाहा – ‘तुरुंगातून सुटताच सूड घेईन’; अभिनेत्रीला मिळाली जीवे मारण्याची धमकी

महाराष्ट्रात ४ हजारांपेक्षा जास्त नवे करोना रुग्ण

महाराष्ट्रात मागील चोवीस तासात ४ हजार १५३ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. १ कोटी २ लाख ८१ हजार ५४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी एकूण १७ लाख ८४ हजार ३६१ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर मागील चोवीस तासांमध्ये ३० रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मागील चोवीस तासात ३ हजार ७२९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत एकूण १६ लाख ५४ हजार ७९३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील करोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९२.७४ टक्के इतका झाला आहे.