News Flash

राधिका आपटेचा हॉलिवूडप्रवास; ‘अ कॉल टू स्पाय’साठी करते दिवसरात्र मेहनत

जाणून घ्या, राधिकाच्या हॉलिवूड चित्रपटाविषयी

आपल्या बिनधास्त अंदाजामुळे ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे. ‘बदलापूर’, ‘पॅडमॅन’, ‘अंधाधून’ या चित्रपटांच्या माध्यमातून राधिकाने तिच्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. त्यामुळे तिची लोकप्रियता केवळ देशातच नाही तर विदेशापर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे राधिका लवकरच एक हॉलिवूड चित्रपटात झळकणार असून या चित्रपटासाठी ती जोरदार तयार करत असल्याचं दिसून येत आहे.

बॉलिवूडमध्य आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केल्यानंतर राधिका लवकरच ‘अ कॉल टू स्पाय’ या हॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात राधिका ब्रिटीश महिला गुप्तहेर नूर इनायत खान ही भूमिका वठविणार आहे. त्यामुळे या भूमिकेला न्याय देण्यासाठी ही प्रचंड मेहनत घेतल असल्याचं पाहायला मिळत आहे.

 

सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणाऱ्या राधिकाने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये तिने तिचा हेअर कट केला असून तिने केस कापल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे या भूमिकेला न्याय देण्यासाठी ती पुरेपूर प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे.

‘अ कॉल टू स्पाय’ हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे. या चित्रपटातून ब्रिटीश महिला गुप्तहेर नूर इनायत खान यांचा जीवनप्रवास उलगडण्यात येणार आहे. नूर इनायत खान या तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या कार्यकाळात गुप्तहेर खात्यात सक्रीय होत्या. त्या ‘मेडेलीन’ या नावाने ओळखल्या जात.

दरम्यान, या हॉलिवूड चित्रपटानंतर राधिका लवकरच ‘रात अकेली’ या बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटामध्ये ती अभिनेता नावजुद्दीन सिद्दीकीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 8:43 am

Web Title: radhika apte as british spy noor inayat khan is very impressive ssj 93
टॅग : Radhika Apte
Next Stories
1 Video : अशोक पत्की सांगतात, ‘काळोख दाटूनी आला’ गाण्यामागील मजेदार किस्सा
2 मदतीवर गरजू कलाकारांऐवजी नाटय़ निर्मात्यांचा डल्ला
3 मराठी भाषेबाबत आपण सारे संकुचित!
Just Now!
X