News Flash

राधिका आपटेची कम्माल….स्कर्टलाच बनवलं लुंगी!

राधिका आपटेने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

अभिनेत्री राधिका आपटे आपल्या अभिनयाने आणि हटके लूक्सने प्रेक्षकांची मने जिंकत असते. ती सोशल मीडियावरही बरीच ऍक्टिव्ह असते आणि आपल्या चाहत्यांशी संपर्कात असते. ती तिचे वेगवेगळे फोटो सतत शेअर करत असते. आत्ताही तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे.

कसल्यातरी चित्रीकऱणादरम्यानचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत राधिका चिल करताना दिसत आहे. तिने मध्येच आपला गाऊन लुंगीसारखा उचलून वर धरला आहे. या व्हिडिओत तिने गुलाबी रंगाचा सुंदर आणि लांब सिल्कचा गाऊन घातला आहे. ती चित्रीकरण सुरु होण्याची वाट पाहत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनही दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

यात ती म्हणते, “लॉकडाऊन पूर्वीचं चित्रीकरण” आणि त्यासोबत तिने सॅड इमोजीही शेअर केला आहे. त्यासोबत तिने #lockdown2021 #letsdothisthing असे हॅशटॅगही दिले आहेत.

राधिकाचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना फारच आवडलेला दिसत आहे. तिचे काही चाहते तिचा व्हिडिओ किती विनोदी आहे यावर बोलत आहेत, तर काही चाहत्यांनी तिच्या ड्रेसवर कमेंट्स केल्या आहेत. बऱ्याच जणांना तिचा ड्रेस फारच आवडला आहे. अनेक चाहत्यांना तिचं ड्रेसला लुंगीसारखं हाताळणं फार आवडलं आहे. अनेकांनी तिच्या या व्हिडिओवर हार्ट, फायर लव्ह असे इमोजीही कमेंट केले आहेत.

राधिकाने हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, बंगाली आणि इंग्रजी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नुकतंच तिची ‘ओके कम्प्युटर’ ही वेबसीरीज २६ मार्च रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 7:25 pm

Web Title: radhika apte carries her gown like lungi fans commented with love vsk 98
Next Stories
1 ‘या’ सत्य घटनेवर आधारित आहे अजय देवगणचा ‘मेडे’ सिनेमा; बिग बी करणार धमाका
2 Video : ‘एक नारळ दिलाय…’, आगरी गाण्यावर रितेशचा भन्नाट डान्स
3 भारतरत्न लता मंगेशकर यांचं रसिकांसाठी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सुरेल सरप्राईझ
Just Now!
X