18 January 2019

News Flash

राधिका हॉलिवूडच्या वाटेवर, गुप्तहेर राजकन्येची सत्यकथा रुपेरी पडद्यावर

दुसऱ्या महायुद्धावर आधारलेला हा चित्रपट असणार आहे. यात राधिका भारतीय वंशाच्या गुप्तहेर राजकन्येची भूमिका साकारताना दिसणार आहे.

राजकन्या ते गुप्तहेर असा नूर यांचा प्रवास राधिका हॉलिवूड चित्रपटात साकारताना दिसणार आहे.

मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेला हॉलिवूडचं दार खुलं झालं असून, दुसऱ्या महायुद्धावर आधारलेल्या हॉलिवूडपटात राधिका इतर दोन अभिनेत्रींसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. राधिकानं ट्विट करून याची अधिकृत घोषण केली आहे.

आपल्या अभिनयाच्या जोरावर राधिकानं मराठीच नाही तर बॉलिवूडमध्येही आपलं स्थान पक्क केलं आहे. स्पष्ट आणि सडेतोड मत मांडणारी अभिनेत्री म्हणून तिला ओळखलं जातं. तिच्या बोल्ड भूमिकांचंही तितकंच कौतुक केलं गेलं. फक्त चित्रपटच नाही तर लघुपट, वेबसिरिजमधूनही राधिकानं साकारलेल्या भूमिका कौतुकास्पद होत्या. आता राधिका दुसऱ्या महायुद्धावर आधारलेल्या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात ती भारतीय वंशाच्या गुप्तहेर राजकन्येच्या भूमिकेत दिसणार आहे. नूर इनायत खान यांची भूमिका ती साकारणार आहे .

टीपू सुलतान यांच्या वंशज असलेल्य नूर इनायत खान या ब्रिटनचे पंतप्रधान विस्टन चर्चिल यांच्या गुप्त सेनेचा भाग होत्या. राजकन्या ते गुप्तहेर असा नूर यांचा प्रवास राधिका यात साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्यापही ठरलं नाही. यात राधिकासोबत स्टेना कॅटिक, सारा मेगन थॉमस या अभिनेत्रीदेखील दिसणार आहे. महिला गुप्तहेरांवर आधारित हा चित्रपट असणार आहे.

First Published on April 16, 2018 10:35 am

Web Title: radhika apte has signed her first international project will be seen in world war ii drama