29 November 2020

News Flash

मादक भूमिकांच्या ऑफर का येतात? राधिकाने सांगितले कारण

एका शोमध्ये राधिकाने हा खुलासा केला आहे

बॉलिवूडमध्ये आपल्या बिनधास्त अंदाजामुळे ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे. राधिकाने ‘बदलापूर’, ‘पॅड मॅन’, ‘अंधाधून’ अशा अनेक हीट चित्रपटांमध्ये काम करत अनेकांच्या मनावर जादू केली आहे. राधिका कोणताही चित्रपट असो प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय मिळवून देते. मात्र बदलापूर चित्रपटातील बोल्ड सीननंतर तिला सेक्स कॉमेडी चित्रपटाची ऑफर आली असल्याचा खुलासा राधिकाने एका शोमध्ये केला आहे.

नुकताच राधिकाने ‘द वुमन’ या शोमध्ये हजेरी लावली होती. दरम्यान तिने ‘बदलापूर’ आणि ‘अहल्या’मधील बोल्ड सीनमुळे सेक्स कॉमेडी चित्रपटाची ऑफर आल्याचा खुलासा केला. ‘लोकांनी मी चित्रपटात मादक भूमिका साकारत असल्याचा समज करुन घेतला आहे. पण माझी कोणत्याही सेक्स कॉमेडी चित्रपटाचा हिस्सा होण्याची इच्छा नाही’ असे राधिका म्हणाली.

राधिकाने तिला सेक्स कॉमेडी चित्रपटाची ऑफर देण्याऱ्या व्यक्तीचे नाव सांगितले नाही पण त्यांनी मी सतत न्यूड सीन देत असल्याचे म्हटले. त्यावर त्यांना मी कोणत्या चित्रपटात न्यूड सीन दिले आहेत? असा प्रश्न विचारला. ‘अहल्या’ आणि ‘बदलापूर’ असे त्यांनी उत्तर दिले. ‘ही सर्वात मोठी समस्या आहे. मी दोन्ही चित्रपटांमध्ये एकही न्यूड सीन दिलेला नाही’ असे राधिका पुढे म्हणाली.

आणखी वाचा : Video : दोन वर्षांची गानकोकीळा; लता दीदींचे ‘हे’ गाणे ती हुबेहुब गाते

राधिका लवकरच एक लघूपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या लघूपटाद्वारे ती दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल टाकणार आहे. या लघूपटाचे नाव ‘स्लीपवॉकर्स’ असे असून हा ३० मिनिटांचा लघूपट असणार आहे. अभिनेता गुलशन देवैया आणि अभिनेत्री शहाणा गोस्वामी या लघूपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वीच या लघूपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 12:17 pm

Web Title: radhika apte on being labelled as a seductress after badlapur avb 95
Next Stories
1 तापसीने साजरा केला मितालीचा वाढदिवस, दिलं खास गिफ्ट
2 रितेश देशमुख कर्जबाजारी आहे का? ट्विटरवर त्यानेच केला खुलासा
3 ‘शंकरा रे शंकरा’; अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित
Just Now!
X