News Flash

‘पॅडमॅन’ फेम राधिका आपटेने सिंगल शर्टमध्ये केलं फोटोशूट; म्हणाली, “मी बेडूक दिसतेय…”

राधिका आपटेचं हे फोटोशूट व्हायरल होत असून फॅन्सनी कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय.

radhika-apte

‘पॅडमॅन’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री राधिका आपटे आपल्या अभिनयासोबतच तिच्या ग्लॅमरस लुकमुळे नेहमीच चर्चेत येत असते. तिने २००५ साली रिलीज झालेल्या ‘वाह लाइफ हो तो ऐसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. ‘पार्च्ड’ चित्रपटानंतर आदिल हुसैनसोबत राधिका बरीच चर्चेत आली होती. तर सोशल मीडियावर सुद्धा ती कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे लाइमलाइटमध्ये येत असते. नेहमीच ती शेअर करत असलेल्या वेगवेगळ्या फोटोंनी फॅन्सना आश्चर्याचा धक्का देत असते. नुकतंच तिने शेअर केलेल्या एका फोटोमुळे फॅन्सच्या मनात अनेक प्रश्नांनी घर केलंय.

सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये राधिका आपटे हिने गुलाबी रंगाचं टॅक्सचर शर्ट परिधान केलाय. सोबतच नियॉन कलरचं स्ट्रॅप टॉप परिधान केलाय. बांधलेले केस आणि सुंदर हास्यासोबत राधिकाचा हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. हा फोटो शेअर करताना तिने एक कॅप्शन देखील लिहिलीय. “प्रत्येक जण प्राणी असतो…मी बेडूक दिसतेय…आणि तुम्ही?” तिने शेअर केलेल्या या फोटोनंतर नेटकऱ्यांनी मात्र राधिकावर आपला निशाणा साधलाय. “तुम्ही तुमची पॅन्ट घरी विसरलात”, “हे काय करतेय”, अशा अनेक कमेंट्स तिच्या फोटोंवर येताना दिसून येत आहेत. तिच्या या फोटोवर दीड लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)


अभिनेत्री राधिका आपटेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलीकडेच ती नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या ‘रात अकेली है’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात ती अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दिसून आली. त्यानंतर आता तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे फॅन्स खूपच उत्सुक झालेले आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2021 12:11 am

Web Title: radhika apte photoshoot in a single shirt goes viral on social media prp 93
Next Stories
1 शोएब इब्राहिमने दिली वडिलांची हेल्थ अपडेट; म्हणाला,”पुढील ७२ तास गंभीर आहेत पण……”
2 सोनू सूद आणि फराह खान पुन्हा एकादा म्युझिक व्हिडीओसाठी एकत्र आले!
3 जेव्हा अरबाज खानला विचारलं, सलमान खान भाऊ असल्यानं कधी नुकसान झालंय का? मिळालं हे उत्तर
Just Now!
X