News Flash

चित्रपटातील ‘सेक्स’ हा एक विकाऊ विषय – राधिका आपटे

'सेक्स' हा विषय समाजात वर्जित असल्याने चित्रपटातून तो एक विकाऊ विषय बनल्याचे चित्रपट अभिनेत्री राधिका आपटेचे मानणे आहे.

| March 16, 2015 06:58 am

radhika450‘सेक्स’ हा विषय समाजात वर्जित असल्याने चित्रपटातून तो एक विकाऊ विषय बनल्याचे चित्रपट अभिनेत्री राधिका आपटेचे मानणे आहे. लवकरच राधिका ‘हंटर’ या चित्रपटात दिसणार आहे. तारुण्यात पाऊल ठेवलेल्या एका युवकाची ही कथा आहे. या चित्रपटाविषयी बोलताना राधिका म्हणाली, आपल्या देशात ‘सेक्स’बाबत एक अजब अशी परिस्थिती आहे, कारण इथे ‘सेक्स’ विकाऊ पण आहे आणि वर्जितदेखील आहे. ‘सेक्स’ वर्जित असल्यामुळे विकाऊ असल्याचे माझे मानणे आहे. ‘हंटर’ चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टरवरून हा चित्रपट एक प्रौढ-विनोदी चित्रपट असल्याचा भास होतो. परंतु, या चित्रपटात आणखी खूप काही आहे. प्रेमकथेवर आधारित असलेला हा एक सामान्य चित्रपट आहे. प्रत्येकजण स्वत:ला या चित्रपटाशी निगडीत असल्याचे अनुभवेल.
(फोटो: बॉलिवूड हंगामा)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2015 6:58 am

Web Title: radhika apte sex is saleable because it is a taboo
टॅग : Bollywood,Radhika Apte
Next Stories
1 अनुष्काचा ‘NH10’ सुसाट… कंगना, राणी आणि विद्याला टाकले मागे
2 का रे दुरावा…
3 ‘वासू’गिरीवरचा सिनेमा
Just Now!
X