21 January 2019

News Flash

सुरज पांचोलीला जिमपेक्षा अॅक्टिंग क्लासची गरज; राधिका आपटेचा खोचक सल्ला

राजकुमार राव मात्र फारच सावधगिरी बाळगत होता

राधिका आपटे

नेहा धुपियाच्या शोमध्ये राधिका आपटे राजकुमार रावसोबत गेली होती. यावेळी तिला नेहाने अनेक उलटे- सुलटे प्रश्न विचारले. या प्रश्नांची उत्तरं देताना राधिकाने सुशांत सिंग राजपूतला ‘ओव्हररेटेड’ अभिनेता म्हटले.

राधिकाला आणि राजकुमार रावला बॉलिवूडमधील ‘ओव्हररेटेड’ अभिनेत्यांबद्दल विचारले असता राधिकाने पटकन सुशांतचे नाव सांगितले. यानंतर जिममध्ये जाण्यापेक्षा अॅक्टिंग क्लासेसमध्ये जाण्याची कोणत्या अभिनेत्याला सर्वात जास्त गरज आहे असा दुसरा प्रश्न विचारला असता तिने सूरज पांचोलीचे नाव घेतले.

एकीकडे राधिका तिला विचारलेल्या सर्व प्रश्नांची निडरपणे उत्तरं देत होती तर राजकुमार राव मात्र फारच सावधगिरी बाळगत होता. तो अडचणीत येईल अशा कोणत्याही प्रश्नांची उत्तरं त्याने दिली नाहीत. तो शांतपणे आला आणि जेवढ्या प्रश्नांची उत्तरं देणं योग्य वाटत होतं तेवढ्याच प्रश्नांची उत्तरं त्याने दिली.

राजकुमार राव लवकरच ‘फन्ने खां’ सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत ऐश्वर्या राय- बच्चन आणि अनिल कपूरही असणार आहेत. तर राधिकाचा ‘पॅडमॅन’ हा सिनेमा २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि सोनम कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सिनेमात राधिकाने अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.

First Published on January 8, 2018 4:42 pm

Web Title: radhika apte slams sushant singh rajput calls overrated actor