News Flash

सेक्स सीन अभिनेत्रीच्या नावेच लीक का होतो? राधिका आपटे

‘द वेडिंग गेस्ट’ या चित्रपटाती राधिका आणि देवचा सेक्स सीन व्हायरल झाला आहे

सेक्स सीन अभिनेत्रीच्या नावेच लीक का होतो? राधिका आपटे

गेल्या कही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे चर्चेत आहे. ‘द वेडिंग गेस्ट’ या चित्रपटातील राधिका आपटे आणि ‘स्लमडॉग मिलियनेअर’ या चित्रपटातील अभिनेता देव पटेल यांचा सेक्स सीन लीक झाला होता. परंतु हा सीन ‘राधिकाचा सेक्स सीन’ म्हणून लीक झाला आहे. त्यावर राधिकाने संतापून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

‘द गेस्ट वेडिंग या चित्रपटात मी आणखी खूप सुंदर सीन केले आहेत. परंतु लोकांच्या मानसिकतेमुळे फक्त बोल्ड सीन लीक झाला आहे. या सीनमध्ये माझ्यासोबत देव पटेलदेखील आहे. पण सीन माझ्या नावानेच लीक होत आहे. पुरुष अभिनेता देव पटेल याच्या नावाखाली हा सीन का लीक झाला नाही’ असा प्रश्न राधिकाने मांडत संताप व्यक्त केला आहे. या आधीही राधिकाचा पार्च्ड (Parched) या चित्रटातील आदिल हुसैनसोबतचा बोल्ड सीन लीक झाला होता.

राधिका आपटे आणि ‘स्लमडॉग मिलियनेअर’ या चित्रपटातील अभिनेता देव पटेल पहिल्यांदाच ‘द वेडिंग गेस्ट’ या चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. राधिका आणि देव त्यांचा आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. चाहत्यांची चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. परंतु आता हा चित्रपट एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. चित्रपटातील राधिका आणि देव यांचा एक बोल्ड सीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या चित्रपटात एका ब्रिटीश मुस्लीम मुलाचा म्हणजेच देव पटेलचा पाकिस्तान ते भारत असा प्रवास दाखवण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2019 5:55 pm

Web Title: radhika apte spoke about her leaked sex scene avb 95
Next Stories
1 Video: माधव देवचकेला बिग बॉस जिंकण्यासाठी राखी सावंतने दिल्या शुभेच्छा
2 Bigg Boss Marathi 2: ‘आता सगळ्यांचा हिशोब होणार’; पराग कान्हेरे परतणार?
3 प्रियांका चोप्राला वाढदिवासाला मिळालं सरप्राइज गिफ्ट
Just Now!
X