News Flash

वाढदिवसा दिवशीही कामात व्यस्त होती राधिका

आगामी सिनेमा 'बॉम्बेरिया'साठी डबिंग करत होती

लवकरच राधिकाचे बॉम्बेरिया, उल्ला आणि द फिल्ड हे सिनेमेही प्रदर्शित होणार आहेत.

‘कबाली’ सुपरस्टार रजनीकांत यांची ऑनस्क्रिन बायको बनलेल्या राधिका आपटेचा ७ सप्टेंबरला वाढदिवस असतो. आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगणारी राधिका तिचा वाढदिवसही धुमधडाक्यात साजरा करेल असं सगळ्यांना वाटलेलं. पण, ती या दिवशी थोडी जास्तच व्यस्त होती. राधिका म्हणाली की, यावर्षी मी माझा वाढदिवस काम करुन एन्जॉय करत आहे. हे माझ्याबरोबर पहिल्यांदाच होत आहे की मी पूर्ण दिवस फक्त काम आणि काम करतेय, पार्टी करायला थोडाही वेळ नाही.
राधिका सध्या तिचा आगामी सिनेमा ‘बॉम्बेरियासाठी’ डबिंग करत आहे. राधिकासाठी हे वर्ष खूपच चांगलं गेलं. यावर्षी तिचे ‘फोबिया’, ‘कबाली’ आणि लघुपट ‘क्रिती’ला चांगला प्रतिसाद मिळाला. लवकरच राधिकाचे ‘बॉम्बेरिया’, ‘उल्ला’ आणि ‘द फिल्ड’ हे सिनेमेही प्रदर्शित होणार आहेत.
राधिका रजनीकांत यांच्यासोबत ‘कबाली’ सिनेमात काम करायला खूप उत्सुक होती. तिच्यासाठी रजनीकांतसोबत काम करणं हे कोणत्याही स्वप्नापेक्षा कमी नव्हतं. तो एक चांगला अनुभव होता. हा सिनेमा मिळण्यासाठी आमच्यामध्ये कोणीही मध्यस्त किंवा कास्टिंग दिग्दर्शक नव्हता. ‘कबाली’चे दिग्दर्शक रंजीत यांनी स्वतः मला फोन केलेला आणि ते म्हणाले की त्यांच्या सिनेमात ते मला घेऊ इच्छितात. त्यांनी मला चेन्नईला येऊन सिनेमाची कथा ऐकायला सांगितले. जेव्हा मला माझ्या व्यक्तिरेखेबद्दल कळलं तेव्हा त्या व्यक्तिरेखेच्या प्रेमातच पडले.
रजनीकांत यांच्याबरोबर काम करण्याच्या अनुभवाबद्दल ती बोलली, रजनी सर सहकलाकाराला नेहमीच प्रोत्साहित करत असतात. ते आपल्या कामाबद्दल नेहमीच समर्पित असतात. जेव्हा मी पहिल्यांदा त्यांना भेटले होते तेव्हा ते त्यांच्या गाडीच्या बाहेर माझी वाट बघत उभे होते. पहिल्यांदा मी त्यांच्याशी मराठीमध्ये बोलले नंतर आम्ही हिंदी आणि इंग्रजीमध्ये बोलत होतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2016 2:22 pm

Web Title: radhika apte was busy working on her birthday
Next Stories
1 सोशल मीडिया तकलादू नाही- कतरिना कैफ
2 ‘कोलावरी’ धनुषचे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण..
3 ‘आशिकी ३’साठी सिद्धार्थ-आलिया
Just Now!
X