छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात करणारी अभिनेत्री म्हणजे राधिका मदन. तिने ‘मेरी आशिकी तुमसे ही’ या मालिकेत काम केले होते. त्यानंतर तिने ‘पटाखा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यापूर्वी राधिकाने ‘स्टूडंट ऑफ द इअर’ या करण जोहरच्या चित्रपटासाठी अॅडिशन दिले होते. त्यावेळचा अनुभव राधिकाने सांगितला आहे.

नुकतीच राधिकाने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने स्टूडंट ऑफ द इअर चित्रपटासाठी ऑडिशन दिल्याचे म्हटले आहे. तसेच हे ऑडिशन तिच्या आयुष्यातील सर्वात खराब अनुभव असल्याचे सांगितले आहे. मी स्टुडंट ऑफ द इअरचे सर्वात खराब ऑडिशन दिले. त्यावेळी मी घाबरले होते. तसेच मला त्यावेळी तापही आला होता. माझ्या आयुष्यातील तो सर्वात बेकार अनुभव होता. मला चित्रपटात घेतले नाही म्हणून मी धर्मा प्रोडक्शनला दोष देणार नाही. हा माझा निर्णय होता. मला संधी मिळाली होती पण मला परफॉर्म करता आले नाही असे राधिका म्हणाली.

 

View this post on Instagram

 

Hey there!

A post shared by Radhika Madan (@radhikamadan) on

राधिकाने ‘पटाखा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘मर्द को दर्द नहीं होता’ या चित्रपटामध्ये काम केले आहे. तसेच तिने ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटातही काम केले. या चित्रपटात दिवंगत अभिनेते इरफान खान यांच्यासोबत तिने स्क्रीन शेअर केली.