News Flash

नवोदित गायकांसाठी ९१.१ एफएमची ‘रेडिओ सिटी सुपर सिंगर’ स्पर्धा

रेडिओ सिटी सुपर सिंगरच्या नवव्या पर्वामध्ये ३९ शहरांमधील होतकरु गायकांचा शोध घेतला जाणार आहे.

रेडिओ सिटी सुपर सिंगर

रेडिओ सिटी ९१.१ एफएम या भारतातील प्रमुख रेडिओ वाहिनीने लव्हइट चॉकलेट्स प्रस्तुक रेडिओ सिटी सुपर सिंगर (आरसीएसएस) या भारतातील सर्वात मोठ्या टॅलेन्ट हंट स्पर्धेच्या नवव्या पर्वाची घोषणा केली आहे. यंदा आणखी ११ बाजारपेठांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवत ही स्पर्धा देशभरातील ३९ शहरांतील श्रोत्यांना सहभागी करून घेणार आहे. भारतातील आघाडीची गानस्पर्धा आरसीएसएसमधून होतकरू गायकांना आपले कसब अवघ्या देशासमोर सादर करण्यासाठी मंच मिळणार आहे.

वाचा : लक्ष्मीकांत बेर्डे यांना गिरगावात राहण्याचा असाही झाला होता फायदा

आजवरच्या प्रवासात रेडिओ सिटी सुपर सिंगर स्पर्धेचा विस्तार प्रचंड वाढला असून, गेली नऊ वर्षे ही स्पर्धा रेडिओ सिटीचा एक दर्शनीय उपक्रम ठरली आहे. ही स्पर्धा रेडिओ वाहिन्यांच्या जगातील सर्वात लोकप्रिय ऐवज ठरली. ‘जिनकी रग रग में है सिंगिंग’ ही यंदाच्या स्पर्धेची संकल्पना असणार आहे. स्थानिक संस्कृतीचे रंग गंध आणि बारकावे टिपण्याच्या हेतूने रेडिओ सिटीने मांडलेल्या ‘रग रग में दौडे सिटी’ मूळ विचाराचाच विस्तार या संकल्पनेमध्ये करण्यात आला आहे. याच विचाराला अनुसरून, रेडिओ सिटी सुपर सिंगरच्या नवव्या पर्वामध्ये ३९ शहरांमधील होतकरु गायकांचा शोध घेतला जाणार आहे. ‘रेडिओ सिटी सुपर सिंगर’ ही एक भन्नाट कल्पना आहे, ज्यातून अनेक नवोदित गायकांना आपले कसब सादर करण्याची संधी मिळत असते. ज्यांच्या नसानसांतून संगीत वाहतंय अशा माझ्यासारख्या मंडळींसाठी हा आदर्श मंच आहे. तब्बल नऊ वर्षं ही मोहीम राबविण्यासाठी रेडिओ सिटी टीमचे अभिनंदन. त्याचबरोबर या स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांचे मी भविष्यासाठी अभिष्टचिंतन करतो,’ अशा शुभेच्छा अभिनेता आयुष्मान खुराना याने दिल्या.

वाचा : ‘बर्थडे गर्ल’ सुनिधी चौहानला लागली मातृत्वाची चाहूल

प्रत्येक शहरातून निवडल्या गेलेल्या पाच स्पर्धकांना मानाचा किताब मिळविण्यासाठी १९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या महाअंतिम सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. अंतिम फेरीत बाजी मारणाऱ्या स्पर्धकाला १ लाख रुपयांचे बक्षिस आणि रेडिओ सिटी ९१.१ एफएम वाहिनीवरील लाइव्ह कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2017 4:17 pm

Web Title: radio city super singer season 9
Next Stories
1 एकता कपूरमुळे पहलाज निहलानी यांना सोडावं लागलं अध्यक्षपद?
2 ‘या’ कारणामुळे झाला सुशांतचा पहिला ब्रेकअप
3 …म्हणून जॉनी लिवर यांना झालेला तुरुंगवास?
Just Now!
X