अभिनेता शाहरुख खानची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘रईस’ या चित्रपटाचीच सध्या चर्चा सुरु आहे. राहुल ढोलकिया दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खानने अवैधरित्या दारुचा धंदा करणाऱ्या एका गुंडाची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन, शाहरुखचा अभिनय या महत्त्वाच्या घटकांमुळे ‘रईस’ खऱ्या अर्थाने बॉक्स ऑफिसवरही आपली श्रीमंती सादर करण्यात यशस्वी ठरत अलस्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावरही या चित्रपटाच्या कमाईचे आकडे आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेच. आठवड्याच्या मध्यावरच शाहरुखचा ‘रईस’ आणि हृतिकचा ‘काबिल’ हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले. त्यातही प्रजासत्ताक दिन, आठवडा आणि महिना अखेर असतानाही शाहरुखच्या या चित्रपटाने अनेकांचेच लक्ष वेधले आहे. ‘काबिल’च्या तुलनेत ‘रईस’ या चित्रपटाच्या कमाईची चांगलीच सुरुवात झाली आहे.

सोशल मीडियावर काही ट्रेड अॅनालिस्टनी या चित्रपटांच्या कमाईचे आकडे पोस्ट केले आहेत. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांच्या ट्विटनुसार शाहरुखच्या शाहरुख खानच्या ‘रईस’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी २१ कोटींचा गल्ला जमविला आहे. भारतासोबतच परदेशातही ‘रईस’ चांगली कमाई करत असल्याची माहितीसुद्धा सूत्रांनी दिली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये या चित्रपटाने २. ७१ लाख तर, न्युझीलंडमध्ये या चित्रपटाने १०.९३ लाख रुपयांची कमाई केली आहे.

‘रईस’ आणि ‘काबिल’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत असल्यामुळे किंग खानचा चित्रपट १५ ते २० कोटींची कमाई करेल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. पण, शाहरुखच्या नावाभोवती असणारे प्रसिद्धीचे वलय, या चित्रपटामध्ये त्याने साकारल्या भूमिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये असणारे कुतुहलाचे वातावरण या सर्वांमुळे चित्रपटाला फायदा झाल्याचे पाहायला मिळत आहे. ‘रईस’चे दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांचेही सध्या प्रचंड कौतुक केले जात आहे. ‘पर्झानिया’ या चित्रपटानंतर इतक्या मोठ्या पातळीवर प्रदर्शित झालेला ‘रईस’ हा राहुल यांचा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटाती संवाद आणि गाणी प्रेक्षकांची दाद मळव आहे. तर, शाहरुखसोबतच या चित्रपटातील सहकलाकारांच्या भूमिकाही अनेकांच्याच पसंतीस येत आहेत. अतुल कुलकर्णी, उदय टिकेकर, मोहम्मद झिशान आयुब, शिबा चड्ढा यांच्या भूमिकाही अनेकांचेच लक्ष वेधत आहेत.

पाहा: VIDEO: सैन्यदलातील जवानांसह शाहरुखने साजरा केला प्रजासत्ताक दिन