News Flash

सनी म्हणतेय, ‘कोई धंधा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा कोई धर्म नहीं होता’

'रईस' चित्रपटात सनी लिओनीने 'लैला ओ लैला' या रिमेक गाण्यावर डान्स केला आहे.

सनी लिओनी

पॉर्न जगतातून बॉलीवूडमध्ये आलेली सनी लिओनी आता चित्रपटसृष्टीत ब-यापैकी स्थिरावली आहे. नुकताच तिचा एक डबस्मॅश व्हिडिओ समोर आला असून त्यामुळे ती चर्चेत आली आहे. यावेळेस तिने चक्क बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खानच्या आवाजात डबस्मॅश केले आहे.

सनी लिओनीने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती शाहरुख खानच्या आगामी ‘रईस’ चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग बोलताना दिसते. ती किंग खानच्या आवाजात म्हणते की, ‘कोई धंधा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा कोई धर्म नहीं होता’.  शाहरुखच्या अंदाजात त्याच्याच चित्रपटाचा डायलॉग बोलणारी सनी यात फार उत्साहित दिसत आहे. काल सोशल मिडीयावर टाकण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत दोन लाखांपेक्षाही अधिक लोकांनी पाहिले आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून सनी ही शाहरुखच्या चाहत्यांना तिच्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. ‘रईस’ चित्रपटात सनी लिओनीने ‘लैला ओ लैला’ या रिमेक गाण्यावर डान्स केला आहे. या  गाण्यातील सनीचा अंदाज अनेकांना भावला आहे.

याआधीही सनी लिओनीने काही डबस्मॅश व्हिडिओ शेअर केले आहेत. गेल्यावर्षी सनीने पती डॅनियल आणि मित्र युसूफ इब्राहिम यांच्यासोबतही डबस्मॅश व्हिडिओ केला होता. सनीच्या आधी सलमान खानने देखील ‘रईस’चा डायलॉग शेअर केला होता. पण, त्या दरम्यान तो डायलॉगच विसरून जातो. तेव्हा व्हिडिओत शाहरुखची एण्ट्री होते. शाहरुख म्हणतो की, काय यार इतका प्रसिद्ध डायलॉग असून तुझ्या लक्षात नाही. त्यावर सलमान म्हणतो, जर ‘रईस’चा डायलॉग ऐकायचा असेल तर शाहरुखच्या तोंडून ऐका, सुलतानला केवळ मैत्री निभावण्यास येते. यावर शाहरुख तरी कुठे गप्प बसणार होता. आपली मैत्री तर जगजाहीर आहे, असे शाहरुखने उत्तर दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 1:00 pm

Web Title: raees sunny leone dubsmashes shah rukh khans iconic dialogue watch video
Next Stories
1 ..अशा प्रकारे अभिषेकने घातली होती ऐश्वर्याला लग्नाची मागणी
2 निवडणूक ओळखपत्रावर बॉलीवूडचा मोस्ट एलिजीबल बॅचलर ठरला ज्येष्ठ नागरिक
3 करणच्या मैत्रीपेक्षा करिनासाठी पैसा झाला मोठा?
Just Now!
X