बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अलिकडेच या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. मात्र हा ट्रेलर पाहून काही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. या चित्रपटाच्या नावात ‘लक्ष्मी’ हा शब्द असल्याने काही प्रेक्षक संतापले आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय कुमारने हिंदू देवतांचा अपमान केला अशी टीका केली जात आहे. दरम्यान या टीकेवर चित्रपटाचा दिग्दर्शक राघव लॉरेंस याने प्रतिक्रिया दिली. चित्रपटाचं नाव ‘लक्ष्मी बॉम्ब’ का ठेवण्यात आलं? याचं कारण त्याने सांगितलं आहे.

अवश्य पाहा – एकाच वेळी ‘ती’ दोघांना करत होती डेट; ‘बिग बॉस’मध्ये झाला डबल डेटिंगचा भांडाफोड

‘लक्ष्मी बॉम्ब’ हा ‘कंचना’ या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रटात राघव लॉरेंस याने मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. जर तमिळ चित्रपटाचं नाव ‘कंचना’ होते तर हिंदतही तेच नाव का ठेवलं नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राघवने या प्रश्नाचं उत्तर दिलं.

अवश्य पाहा – माधुरीला वाचवण्यासाठी आमिताभ-गोविंदा यांनी गुंडांसोबत केली होती फाईट; पाहा व्हिडीओ…

तो म्हणाला, “तमिळ चित्रपटात एका व्यक्तिरेखेचं नाव कंचना होतं. त्यावरुनच चित्रपटाचं नाव देखील कंचना असंच ठेवण्यात आलं. तमिळ भाषेत कंचना या शब्दाचा अर्थ सोनं असा होतो. अर्थान कंचना हे देवी लक्ष्मीचं एक रुप आहे असं आम्ही मानतो. परंतु हा संदर्भ कदाचित हिंदी भाषिकांना कळणार नाही त्यामुळे आम्ही चित्रपटाचं नाव लक्ष्मी बॉम्ब असं ठेवण्याचा निर्णय घेतला. ज्या प्रमाणे आपण लक्ष्मी बॉम्बचा धमाका विसरु शकत नाही तसाच धमाका या चित्रपटाने देखील करावा अशी आमची इच्छा आहे. या चित्रपटातून आम्ही हिंदू देवतांचा अपमान केलेला नाही.”

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट ‘कंचना’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. यामध्ये अमिताभ बच्चनसुद्धा भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. राघवा लॉरेन्सने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म वितरकांनी या चित्रपटाचे हक्क तब्बल १२५ कोटी रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले जात आहे. येत्या ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.