19 September 2020

News Flash

घटस्फोटानंतर वर्षभराच्या आतच ‘रोडिज’ फेम रघु चढणार बोहल्यावर

२०१८ च्या सुरूवातीला रघुनं पत्नी सुगंधा गर्ग हिच्याशी घटस्फोट घेतला. सुगंधा अभिनेत्री, मॉडेल आणि सुत्रसंचालिका म्हणून प्रसिद्ध आहे.

‘रोडिज’ या रिअॅलिटी शोमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता रघु राम आता दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे. आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमधून त्यानं डिसेंबर महिन्यात विवाहबंधनात अडकणार असल्याचं जाहीर केलं आहे. २०१८ च्या सुरूवातीला रघुनं पत्नी सुगंधा गर्ग हिच्याशी घटस्फोट घेतला. सुगंधा अभिनेत्री, मॉडेल आणि सुत्रसंचालिका म्हणून प्रसिद्ध आहे. घटस्फोटाला काही महिनेही उलटत नाही तोच रघुनं कॅनेडियन प्रेयसी नताली दी ल्यूसिओ सोबत साखडपुडा उरकला. आता तो पुढील महिन्यात तिच्याशी विवाहबंधनात अडकणार आहे.

ऑगस्ट महिन्यात रघू आणि नतालीचा साखरपुडा पार पडला. दीड वर्षांपासून नताली आणि रघु एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर रघुनं पत्नी सुगंधापासून घटस्फोट घेतला. नताली कॅनेडिअन गायक असून इंग्लिश विंग्लिश, लेडीज वर्सेस रिकी बेहल, चेन्नई एक्स्प्रेस यांसारख्या चित्रपटासाठी तिनं गाणं गायलं आहे. गोव्यामध्ये हे दोघंही लग्न करणार असल्याचं समजत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2018 2:09 pm

Web Title: raghu ram confirms december wedding with natalie di luccio
Next Stories
1 छोट्या पडद्यावरही लगीनघाई; ‘सारे तुझ्याचसाठी’ मालिकेत श्रुती- कार्तिक होणार विवाहबद्ध
2 Video : पुन्हा एकदा रोमॅण्टिक होणार ‘किंग खान’
3 ‘अन्य’च्या निमित्ताने प्रथमेश परबची बॉलिवूडमध्ये हॅट्रिक
Just Now!
X