News Flash

दिशा पटाणीच्या हॉट फोटोवर राहुल वैद्यने केली कमेंट, म्हणाला…

जाणून घ्या राहुल काय म्हणाला...

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटाणी तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोमुळे कायमच चर्चेत असेत. ती सोशल मीडियावर सतत तिचे फोटो शेअर करताना दिसते. नुकताच दिशाने शेअर केलेल्या हॉट फोटोवर ‘बिग बॉस १४’मधील स्पर्धक राहुल वैद्यने कमेंट केली आहे. त्याच्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

दिशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक हॉट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती बेडवर बसली असून फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. तिच्या या हॉट फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला. पण राहुल वैद्यने केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani)

PHOTOS: बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्री दिशा पटाणीचे वांद्रे येथील स्टायलिश घर

राहुलने कमेंट करत ‘दिशा हे नावच खास आहे’ असे म्हटले आणि त्यासोबतच आगीचा इमोजी वापरला आहे. राहुलने कमेंटमध्ये त्याची गर्लफ्रेंड दिशा परमारला देखील टॅग केले आहे.

राहुल वैद्य लवकरच अभिनेत्री दिशा परमारशी लग्न करणार आहे. बिग बॉस १४च्या घरात असताना राहुनने दिशाला लग्नासाठी विचारले होते. आता ते कधी लग्नबंधनात अडकणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा ‘Madhanya’ म्यूझिक व्हिडीओ प्रदर्शित झाला होता. हा व्हिडीओ प्रदर्शित होण्यापूर्वी त्यामधील दिशा आणि राहुलचा लूक पाहून त्यांनी लग्न केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण ‘Madhanya’ प्रदर्शित होताच या सर्व चर्चांना अफवा असल्याचे समोर आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2021 2:12 pm

Web Title: rahul vaidya comment on disha patani hot photo avb 95
Next Stories
1 ‘मी सुखरुप आहे, अफवा पसरवणारे…’; गौतमी देशपांडे अपघातातून थोडक्यात बचावली
2 आमिर खानने तब्बल १२ दिवस आंघोळ केली नाही!; कारण ऐकून म्हणाल…
3 लारासाठी स्वतः डिझाईन केली अंगठी; अशी आहे लारा आणि महेश भूपतीची प्रेमकहाणी!
Just Now!
X