News Flash

‘स्वेटशर्ट रूबीनाकडून भाड्याने घेतले की चोरी केले?’ राहुल वैद्य ट्रोलर्सच्या निशाण्यावर

का म्हणतात असं नेटकरी जाणून घ्या

‘बिग बॉस’ १४चा रनरअप ठरलेला गायक राहुल वैद्य आणि विजेता रुबीना दिलैक यांनी बिग बॉसचे हे पर्व गाजवले. शोमध्ये या दोघांमध्ये सुरू असलेल्या भांडणामुळे ते कायमच चर्चेत असायचे. आता ‘बिग बॉसचे’ हे पर्व संपल्या नंतर हे दोघे ही त्यांचा जवळच्या लोकांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत. मात्र, आता एका स्वेटशर्टमुळे राहुल वैद्यला रूबीनाच्या चाहत्यांनी ट्रोल केलं आहे.

राहुल त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री दिशा परमार सोबत वेळ घालवण्यासाठी मुंबईच्या बाहेर गेला होता. सुट्टीचा आनंद घेताना राहुलने ट्विटरवर एक फोटो शेअर केला होता. ज्यात ते दोघेही हॅलिकॉप्टरसमोर उभे असल्याचे दिसते. त्या फोटोत राहुलने जे स्वेटशर्ट परिधान केले आहे. तेच स्वेटशर्ट रूबीनाने बिग बॉसच्या घरात परिधान केले होते.

आता रूबीनाच्या चाहत्यांनी रूबीनाचा बिग बॉसच्या घरातला फोटो आणि राहुलचा हॅलिकॉप्टरसमोरचा फोटो कोलाज करून शेअर केला आहे. त्याला कॅप्शन देत एक नेटकरी म्हणाला, “बघा हा खरा कॉपीकॅट आहे. राहुल वैद्यचे रूबीनावरचे ऑब्सेशन यातून दिसून येत आहे.” तर दुसरा राहुलची खिल्ली उडवत म्हणाला, “सगळं ठीक आहे, पण तू हे स्वेटशर्ट रूबीना कडून भाड्याने घेतले की चोरी केले? लवकर परत करून दे.”

Next Stories
1 हार्दिक जोशीच्या कुटुंबीयांनी केलं नव्या सदस्याचं स्वागत
2 “ती म्हणजे मला देवानं दिलेलं गिफ्ट आहे”, शक्ती कपूर झाले भावूक
3 करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून रवीनाचा अजब उपाय, पाहा मजेशीर व्हिडीओ
Just Now!
X