News Flash

राहुल वैद्यला मित्रांनीच दिला दगा; सांगितला लग्नातील मजेशीर प्रसंग

राहुल-दिशाच्या लग्नानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी राहुल वैद्य याने लग्नातील मजेशीर प्रसंग सांगितला.

‘बिग बॉस’ फेम गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार हे दोघेही अखेर लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. या लव्ह बर्ड्सच्या लग्नाचे फोटोज आणि व्हिडीओज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. लग्नानंतर राहुल-दिशाने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी फोटोग्राफर्ससमोर रोमॅण्टिक पोज दिल्या आणि मीडियासोबत बातचीत केली. यावेळी राहुल वैद्य याने लग्नातील बूट लपवण्याच्या विधीसंदर्भात एक खुलासा केलाय.

राहुल-दिशा विवाहबंधना अडकल्यानंतर त्यांनी एक पब्लिक इंटव्ह्यूव्ह दिला. माध्यमाशी बोलताना त्यांनी लग्नात आपल्या मित्रांनीच धोका दिला असल्याचं राहुलने सांगितलं. याचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. यावेळी राहुल म्हणाला, “मला माझ्या मित्रांनीच धोका दिला. अली गोनीने माझे बूट लपवून ठेवले होते. त्याच्याकडे ते बूट सुरक्षित होते. पण माझ्या आणखी एक दुसऱ्या मित्राने अलीकडून बूट मागवले होते आणि मित्र असल्यामुळे अलीने ते बूट त्याला दिले सुद्धा…त्या मित्राने ते बूट माझ्या मेव्हणींना देऊन टाकले.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

यापूढे बोलताना राहुल म्हणाला, “याचा मला खूप मोठा फटका बसला. माझे बूट परत मिळवण्यासाठी मला मोठी किंमत मोजावी लागली. आता तुम्ही या विषयावर मला विचारून माझ्या जखमेवर मीठ चोळत आहात..” राहुल वैद्य जेव्हा त्याची आपबीती सांगत होतो, त्यावेळी दिशा परमार हसताना दिसून आली. लग्नात तिची गर्ल्स गॅंग जिंकली त्यामूळे ती आनंदात होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by ~ علی گونی (@alygoni)

राहुल-दिशाच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दोघांच्या जोडीने फॅन्सचं मन जिंकलंय. राहुल आणि अलीची मैत्री बिग बॉसच्या घरात झाली होती. या दोघांच्या रिसेप्शन पार्टीत अली, जास्मिन भसीनसह ‘खतरो के खिलाडी 11’ चे स्पर्धक देखील आले होते. या रिसेप्शन पार्टीत राहुल-दिशाने जबरदस्त डान्स सुद्धा केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 8:42 pm

Web Title: rahul vaidya reveals due to aly goni he paid heavy amount in juta churai prp 93
Next Stories
1 …म्हणून करोना नियम तोडावे लागतात; सोनू सूदने व्यक्त केला अनुभव
2 सुनिल शेट्टीने मुलगी अथिया आणि क्रिकेटर केएल राहुलच्या नात्यावर सोडलं मौन; दिले हे संकेत
3 मनोज वाजपेयी आणि नीना गुप्ताच्या ‘DIAL 100’चं मोशन पोस्टर रिलीज
Just Now!
X