काही दिवसांपूर्वी बिग बॉस १४च्या घरातील स्पर्धक, गायक राहुल वैद्यने कुटुंबीयांची आठवण येत असल्यामुळे घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. राहुलने घर सोडताच चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता पुन्हा बिग बॉसच्या घरात राहुलची एण्ट्री झाली आहे. राहुल घरात येताच त्याला घरातील इतर स्पर्धकांनी गर्लफ्रेंडने काय उत्तर दिले हे विचारले आहे.
काल बिग बॉस १४मध्ये राहुल वैद्यची एण्ट्री झाली. त्याला पाहून घरातील इतर स्पर्धक आनंदी झाले आणि त्याला मिठी मारताना दिसले. तितक्यात जॅस्मीनसुद्धा राहुल जवळ येते आणि त्याला मिठी मारते. ती राहुलला गर्लफ्रेंड दिशा परमारने प्रपोजलला काय उत्तर दिले असे विचारते.
View this post on Instagram
त्यानंतर दिशा काय म्हणाली हे जाणून घेण्यासाठी घरातील इतर स्पर्धक देखील उत्सुक होतात. तेव्हा राहुल म्हणाला, ‘अजून नाही पण…’ त्यावेळी राहुलच्या चेहऱ्यावर हसू दिसते.
काही दिवसांपूर्वी राहुनने सर्वांसमोर दिशाला लग्नासाठी प्रपोज केले होते. पण दिशाने काय उत्तर दिले हे अद्याप समोर आलेले नाही. दिशा परमार ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत. ‘प्यार का दर्द है, मीठा मीठा प्यारा प्यारा’,’वो अपनासा’ या कार्यक्रमात ती महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली आहे. ‘प्यार का दर्द है, मीठा मीठा प्यारा प्यारा’ या मालिकेत तिने पंखुडी ही व्यक्तीरेखा साकारली होती. विशेष म्हणजे तिची ही भूमिका विशेष गाजली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 16, 2020 8:14 pm