News Flash

राहुल वैद्य आणि पत्नी दिशाचा मराठमोळ्या पेहेरवातला फोटो होतोय सोशल मीडियावर व्हायरल

दिशा परमार आणि राहुल वैद्यचा 'हा' फोटो होतो आहे सोशल मीडियावर व्हायरल.

Photo-Rahul Vaidya Instagram

बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमा नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. राहुल आणि दिशाच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लग्नानंतर राहुलच्या घरी पूजा केली होती. दिशा आणि राहुलचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

हा फोटो राहुल आणि दिशाच्या लग्नानंतर करण्यात आलेल्या श्री सत्यनारायणाची पूजा करतानाचा आहे. या फोटोत दिशा  मराठमोळ्या अंदाजात दिसून येत आहे.  दिशाने गुलाबी रंगाची साडी नेसली असून, त्याला साजेल असा शृंगार देखील केला आहे. तर दुसरीकडे राहुल वैद्यने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला असून दोघही खूप छान दिसत आहेत.

नुकताच दिशा आणि राहुलचा गृहप्रवेश करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत दिशा आणि राहुलचं औक्षण करून राहुलची आई त्या दोघांचे स्वागत करताना दिसत होती. दिशाने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला असून ती या लूकमध्ये सुंदर दिसत होती. दुसरीकडे राहुलने देखील लाल रंगाचा टी-शर्ट आणि पॅन्ट परिधान केला होता.

राहुल आणि दिशाचा हा पारंपरिक लूक प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. राहुलने दिशा परमारला अनोख्या अंदाजात मागणी घातली होती. त्यानंतर दोघांनी सोशल मीडियाद्वारे लग्न करत असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. दरम्यान, राहुल ‘बिग बॉस १४’ नंतर कलर्सवरील स्टंट बेस शो ‘खतरो के खिलाडीच्या १२’ मध्ये दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 4:13 pm

Web Title: rahul vaidyas wife disha parmar post wedding rituals ethnic look photo went viral aad 97
Next Stories
1 “शिल्पा शेट्टीला होती राज कुंद्राच्या पॉर्न रॅकेटची माहिती, तिचीही चौकशी करा”
2 ‘द कपिल शर्मा शो’मधून सुमोनला दाखवला बाहेरचा रस्ता? सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
3 ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड साकारणार जिजाऊंची भूमिका
Just Now!
X