21 July 2018

News Flash

लग्नाआधीच इलियाना डिक्रुझ गरोदर?

मला माहित नाही मी यावर काय उत्तर देऊ. सध्या माझं खासगी आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य चांगलं सुरू आहे

इलियाना डिक्रूझ, अँड्र्यू नीबोन

अजय देवगणच्या रेड सिनेमातील अभिनेत्री इलियाना डिक्रुझ गरोदर असल्याच्या चर्चा सध्या सिनेवर्तुळात आहेत. काही दिवसांपूर्वी इलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या प्रियकरासोबतचे काही फोटो शेअर केले होते. हे फोटो पाहून तिने प्रियकर अॅड्यू नीबोनसह लग्न केले की काय असाच प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. तिच्या लग्नाच्या चर्चांवरून पडदा उठतो न उठतो तोच आता इलियाना गरोदर असल्याच्या चर्चा सिनेवर्तुळात सुरू आहेत.

Love is all you bloody need. ♥️

A post shared by Ileana D'Cruz (@ileana_official) on

मीडिया रिपोर्टनुसार, अनेकदा इलियानाला घट्ट आणि तोकड्या कपड्यांमध्ये पाहण्यात आले आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये ती अशाच प्रकारचे कपडे घालायला प्राधान्य देते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती सैल कपडे घालत असल्यामुळे अनेकांना ती गरोदर असल्याचे वाटत आहे. पण तिला याबद्दल विचारले असता तिने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास मनाई केली. इलियानाला तिचे खासगी आयुष्य गुलदस्त्यातच ठेवायला आवडते. त्यामुळे तिने जर अचानक बाळासोबतचा तिचा फोटो शेअर केला तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

इलियाने तिच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये नीबोनला ‘हबी’ असे म्हटले होते. यावरुनच सोशल मीडियावर इलियाना डिक्रुझने प्रियकर अॅड्यू नीबोनशी लग्न केले असल्याचे म्हटले जात आहे. पण याबद्दल इलियानाला विचारले असता ती म्हणाली की, ‘मला माहित नाही मी यावर काय उत्तर देऊ. सध्या माझं खासगी आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य चांगलं सुरू आहे. मला माझं खासगी आयुष्य सर्वांसमोर आणायचे नाही. त्यामुळे यावर जास्त न बोललेलंच बरं. माझ्या खाजगी आयुष्याशिवायही जगाला दाखवण्यासाठी अनेक गोष्टी आहेत.’

👋🏼🌏🍓 always ❤️

A post shared by Ileana D'Cruz (@ileana_official) on

इलियाने लिव्ह इन रिलेशनशिप आणि लग्न यांच्यात काहीच अंतर नसल्याचे तिने म्हटले होते. ‘या दोघांमध्ये फक्त एक कागदाचा तुकडा येतो जो या दोघांना वेगळं करतो. अनेकांसाठी लग्न फार महत्त्वपूर्ण असते. लग्नामुळे अनेक गोष्टी बदलतात. पण मी नात्याला एकाच चष्म्यातून पाहत नाही. माझ्या प्रियकराला दिलेले वचन या सर्व गोष्टींमुळे बदलणारे नाही.’

Just everything ♥️ 📷 @andrewkneebonephotography

A post shared by Ileana D'Cruz (@ileana_official) on

First Published on April 17, 2018 2:12 pm

Web Title: raid movie actress ileana dcruz and andrew kneebone expecting a baby