News Flash

रानू मंडल यांना प्रसिद्धी मिळताच १० वर्षांनंतर परतली मुलगी

पैसा व प्रसिद्धी मिळताच मुलीने आईकडे धाव घेतल्याची टीकाही सोशल मीडियावर होत आहे.

रानू मंडल व त्यांची मुलगी

राहण्यासाठी घर नव्हतं, खाण्यासाठी अन्न नव्हतं. फक्त होता सुरेल आवाज. या आवाजाने आज त्यांना जगभरात ओळख मिळवून दिली आहे. रेल्वे स्टेशनवर गाणं गाणाऱ्या रानू मंडल यांच्याबद्दल आम्ही बोलत आहोत. कोलाकातामधील एका रेल्वे प्लॅटफॉर्मवर गाणं गातानाचा त्यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आणि त्यांना एक नवीन ओळख मिळाली. संगीतकार व गायक हिमेश रेशमियासाठी त्या पार्श्वगायनसुद्धा करणार आहेत. रानू यांना पैसा व प्रसिद्धी तर मिळालीच पण त्याहून मौल्यवान भेट त्यांना सोशल मीडियामुळे मिळाली. तब्बल दहा वर्षांनंतर रानू यांची मुलगी त्यांच्याकडे परतली आहे.

रानू मंडल त्यांच्या मुलीपासून तब्बल दहा वर्षं दूर राहिल्या होत्या. पण व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर मुलीने त्यांचा शोध घेतला असून ती त्यांच्याकडे परतली आहे. माझी मुलगी परत आल्यामुळे खूप आनंद झाला असून माझ्या दुसऱ्या आयुष्याला सुरुवात झाल्याचे रानू यांनी सांगितले. तर दुसरीकडे पैसा व प्रसिद्धी मिळताच मुलीने आईकडे धाव घेतल्याची टीकाही सोशल मीडियावर होत आहे.

आणखी वाचा : या सामान्य व्यक्तीमुळे रानू मंडल रातोरात झाली स्टार 

रानू यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या अतिंद्र चक्रवर्ती या तरूणाने टीकांवर त्याची प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये त्याने लिहिलं की, ”आज मी खरंच खूप खूश आहे. केवळ देवच जाणतो की, मी का खूश आहे? पैसा आयुष्यात खूप मोठी गोष्ट नाहीये. माझ्या एका व्हिडीओमुळे रानू आज आपल्या मुलीला परत भेटली आहे.”

रानू हिमेशच्या ‘हॅपी हार्डी और हिर’ या बॉलिवूड चित्रपटाच्या माध्यमातून पार्श्वगायन करणार आहेत. या चित्रपटात त्या ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणं गाताना दिसणार आहेत. त्याचप्रमाणे खुद्द हिमेशने सुद्धा ‘तेरी मेरी कहानी’ गाण्याला आवाज दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 26, 2019 7:46 pm

Web Title: railway station singer and social media sensation ranu mandal meets her daughter after 10 years ssv 92
Next Stories
1 Video : ‘टिप टिप बरसा पानी,’ गाण्यावर रवीनासोबत थिरकला प्रभास
2 बिग बॉसनंतर शिवानी सुर्वे दिसणार ‘या’ चित्रपटांमध्ये
3 अनन्या पांडेने व्यक्त केली या अभिनेत्यासोबत काम करण्याची इच्छा
Just Now!
X