16 December 2017

News Flash

अभिनेत्री रायमा सेन प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास उत्सुक

रवींद्रनाथ ठाकूर यांची वहिनी आणि त्यांच्या अनेक कवितांचे प्रेरणास्थान असलेल्या कादंबरी देवीची भूमिका रुपेरी

कोलकाता | Updated: December 18, 2012 5:59 AM

रवींद्रनाथ ठाकूर यांची वहिनी आणि त्यांच्या अनेक कवितांचे प्रेरणास्थान असलेल्या कादंबरी देवीची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारणारी अभिनेत्री रायमा सेन प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास उत्सुक आहे. रितुपर्णो घोष यांनी रवींद्रनाथ यांच्या जिवनपटावर चित्रपट बनविला आहे यात रायमाने कादंबरी देवीची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील कादंबरी देवीच्या भूमिकेचे गांभिर्य लक्षात घेता याबाबतीत मला प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणे महत्वाचे असल्याचे रायमाने सांगितले. तसेच हिंदी आणि बंगाली चित्रपटात काम करणाया रायमाने माझ्यादृष्टीने ही एक महत्वाची भूमिका आहे आणि मला आशा आहे की या भूमिकेतून मी रितूदांच्या आशेला तडा जाऊ दिलेला नाही.’ असेही तीने स्पष्ट केले.

First Published on December 18, 2012 5:59 am

Web Title: raima sen eager to know viewers comments
टॅग Bollywood,Raima Sen