07 December 2019

News Flash

राज कपूर यांचे या अभिनेत्रीसोबत होते अफेअर

राज कपूर यांच्या रिलेशनशीपमुळे पत्नीने घर सोडले होते

बॉलिवूड चित्रपटसृष्टीमधील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे वैजयंती माला. वैजयंती माला यांचा जन्मदिवस आहे. चेन्नईमध्ये जन्माला आलेल्या वैजयंती माला यांचा आजा ८३ वा वाढदिवस आहे. वैजयंती माला यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये जवळजवळ दोन दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. वैजयंती माला यांना ट्विंकल टोज (twinkle toes) हा खिताब देखील मिळाला आहे.

वैजयंती माला यांनी त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी अभिनयाच्या करिअरला १९४९मधील तमिळ चित्रपट ‘वडकई’ने सुरुवात केली होती. त्यावेळी त्यांचे वय १३ वर्षे होते. त्यानंतर त्यांनी १९५०मध्ये प्रदर्शित झालेला ‘जीवितम’ या तमिळ चित्रपटात काम केले. या दोन चित्रपटांनंतर त्या दाक्षिणेकडे लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखू जाऊ लागल्या. वैजयंती माला यांनी १९५५मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘देवदास’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘देवदास’मध्ये त्यांनी चंद्रमुखीची भूमिका साकारली आणि या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्तकृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून फिल्मफेअरमध्ये पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. वैजयंती माला यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण १९५८मध्ये त्यांचे दोन चित्रपट ‘साधना’ आणि ‘मधुमति’ सुपरहिट ठरले आणि त्यांचे करिअर एका वेगळ्याच शिखरावर जाऊन पोहोचले.

वैजयंती माला आणि राज कपूर यांच्या नात्याच्या तेव्हा जोरदार चर्चा सुरु होत्या. त्यांनी ‘नजराना’ आणि ‘संगम’ या चित्रपटात एकत्र काम केले. काही दिवसांपूर्वी ऋषी कपूर यांनी त्यांची ऑटोबायोग्राफी लॉन्च केली होती. त्यामध्ये त्यांनी सर्वांना आश्चर्यचकित करणाऱ्या काही गोष्टींचा खुलासा केला. ऋषी कपूर यांच्या वडिलांचे कुणावर तरी खूप प्रेम होते. परंतु त्यांचे लग्न होऊ शकले नाही. ‘माझे वडिल आणि वैजयंती माला यांच्या नात्यामुळे मला आणि माझ्या आईला घर सोडावा लागले होते. त्यानंतर आम्ही मरीन ड्राव्ह येथील नटराज हॉटेलमध्ये काही दिवस राहिलो’ असे ऋषी कपूर यांनी लिहिले होते

First Published on August 13, 2019 3:40 pm

Web Title: raj kapoor affair with this actress avb 95
Just Now!
X